शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

आॅटोचालकांचा संमिश्र बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 22:08 IST

पोलीस उपनिरीक्षकाने आॅटोचालकाला विनाकारण मारहाण केल्याच्या निषेधार्थ आॅटो चालक-मालक संघटनेच्या नेतृत्वात मंगळवारी शहरात बंद पाळण्यात आला. बंदला शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. एकदिवसीय बंदमुळे काही ठिकाणी नागरिकांची गैरसोय झाली. मारहाण करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाविरूद्ध कारवाई करण्याची मागणी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्याकडे शिष्टमंडळाने निवेदनातून केली.

ठळक मुद्देमारहाणीचा निषेध : पोलीस अधीक्षकांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पोलीस उपनिरीक्षकाने आॅटोचालकाला विनाकारण मारहाण केल्याच्या निषेधार्थ आॅटो चालक-मालक संघटनेच्या नेतृत्वात मंगळवारी शहरात बंद पाळण्यात आला. बंदला शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. एकदिवसीय बंदमुळे काही ठिकाणी नागरिकांची गैरसोय झाली. मारहाण करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाविरूद्ध कारवाई करण्याची मागणी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्याकडे शिष्टमंडळाने निवेदनातून केली.३० जून रोजी आॅटोचालक अशोक कुंड हे महात्मा गांधी चौकात नो पार्किंगमध्ये प्रवाशांच्या प्रतीक्षेत उभे होते. यावेळी पोलीस निरीक्षकाने चालान फाडून कलम २८३ अन्वये कारवाई करण्यास कुणाचा आक्षेप नव्हता. परंतु, ठाण्यात बंद करून कुंड यांना बेदम मारहाण केली. कायद्याचे रक्षण करणारेच कायदा हातात घेऊन अन्याय केल्याचा आरोप आप आॅटो चालक-मालक संघटनेने केला. या घटनेचा निषेध म्हणून मंगळवारी शहरातील सर्व आॅटो बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. परिणामी, महाराष्ट्र आॅटो संघटना, भीमशक्ती आॅटो संघटना व अन्य संघटनांच्या पदाधिकारी सभा घेऊन आज शहरात कडकडीत बंद पाळला. पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी यांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली. आॅटो संघटनेचे अध्यक्ष शंकर धुमाळे, शहरध्यक्ष शेख अमजद, बलराम शिंदे, बंडू भगत, पुरूषोत्तम किल्लारे, शाबास पठाण, अशोक कुंडू, मारोती धकाते, खलील शेख, रियाज शेख, शहिद शेख, बंडू पेंदाम, मुजफर शेख, सुनील मूसळे, भिवराज सोनी, संतोष दोरखंडे, योगेश आपटे, संदीप पिंपळकरे आदींची उपस्थिती होती.