शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."
2
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...
3
कोलकाता: 'तो' बलात्कार होता तर आरोपीच्या अंगावर 'लव्ह बाईट्स' कसे? वकिलाचा धक्कादायक सवाल
4
KL राहुलला विश्वासच बसेना! क्रिस वोक्सनं अप्रतिम चेंडूवर उडवला त्रिफळा (VIDEO)
5
राहुल आणि सोनिया गांधींनी केलेला २००० कोटी रुपये लाटण्याचा प्रयत्न; ईडीचा मोठा आरोप
6
लग्नाआधीच अनेकदा तुझ्या रूममध्ये का दिसायची रितिका? भज्जीच्या प्रश्नावर रोहित शर्माचं भन्नाट उत्तर
7
भयंकर! कुत्रा चावल्यामुळे कबड्डीपटूचा तडफडून मृत्यू; अँटी रेबीज इंजेक्शन न घेणं बेतलं जीवावर
8
काय वाटले असेल...? एनआयटी टॉपरला ४५ लाखांचे पॅकेज मिळाले अन् अचानक नोकरीवरून काढले...
9
Pitru Paksha 2025: यंदा पितृपक्षावर दोन ग्रहणांचे सावट; श्राद्धविधीत होणार अडचण? 
10
३ कोटी २० लाख सरकारी निधी हडपण्याचा डाव उघड; आमदार प्रसाद लाड यांचा खळबळजनक आरोप
11
अवघी दिल्ली एवढी लोकसंख्या, तरीही भारताच्या दृष्टीने 'घाना' देश महत्त्वाचा! कारण तरी काय?
12
सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीची चमकही झाली कमी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवी किंमत
13
पवार काका-पुतण्यांना दे धक्का; NCP च्या दोन्ही गटातील दिग्गज नेत्यांचा भाजपामध्ये प्रवेश
14
Apoorva Mukhija : "मी सिंगल आहे, मला आता लग्न करायचंय; बॉयफ्रेंड शोधतेय, प्लीज कोणीतरी..."
15
Viral Video : हत्तीचं पिल्लू इवल्याशा बेडकाला घाबरलं; क्यूटनेस व्हिडीओनं नेटकऱ्यांचं मन जिंकलं!
16
जे कुणाला जमलं नाही ते टीम इंडियानं करून दाखवलं; इंग्लंडच्या मैदानात रचला इतिहास
17
कशापाई तू वारी हट्ट केलास रे बाळा.. आता मी घरी एकटीच जाऊ का; गोविंदासाठी आजीने फोडला हंबरडा
18
Chanakyaniti: चाणक्यनीतीनुसार तरुणपणी केलेल्या 'या' तीन चुका म्हातारपणी भोवतात!
19
IND W vs ENG: स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा टी२० क्रिकेटमधील सुपरहिट जोडी, रचला नवा इतिहास!
20
'एक दिवसाचा पंतप्रधान'! आशिया खंडातील देशात उद्भवला बाका प्रसंग, 'नायक' सिनेमा आठवेल...

कलर्स प्रस्तुत सखी मंचतर्फे ‘ तू माझा स्वाभिमान’ स्पर्धा

By admin | Updated: December 22, 2016 01:47 IST

आपल्या मुलांना जीवनाचा आनंद देणारे, त्यांना चांगले भविष्य देणारे त्यांचे पालक आणि कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य आपली पसंत- नापसंत याकडे दुर्लक्ष करतात.

आई-मुलींचे सादरीकरण : आई-मुलींच्या भावविश्वावर आधारित कार्यक्रम चंद्रपूर : आपल्या मुलांना जीवनाचा आनंद देणारे, त्यांना चांगले भविष्य देणारे त्यांचे पालक आणि कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य आपली पसंत- नापसंत याकडे दुर्लक्ष करतात. ते मुलांच्या करिअर आणि भविष्याचा मुख्य आधार असतात. यात आईची भूमिका अतिशय संवेदनशील ठरते. कर्तव्य आणि प्रेमाचा संगम आईमध्ये पाहावयास मिळतो. याच विषयावर लोकमत सखी मंच आणि कलर्सतर्फे तू माझा स्वाभिमान या कार्यक्रमाचे आयोजन येथील आयएमए सभागृहात गंजवार्ड चंद्रपूर येथे करण्यात आले. यात आई आणि मुलींच्या मैत्रीपूर्ण भावनात्मक नात्यावर आधारीत आम्ही दोघी माय- लेकी’ ही स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेच्या चार राऊंडमध्ये आई-मुलींच्या जोड्यांनी व्यासपीठावर प्रभावी सादरीकरण केले. स्पर्धेच्या पहिल्या रांऊडमध्ये आई आणि मुलींच्या जोडीने कविता, शेरी शायरीच्या अंदाजात एकमेकांची ओळख करुन दिली. दुसऱ्या राऊंडमध्ये आई-मुलीने गायन, नृत्य, रांगोळी, पाककृती, अभिनय आदी सादर केले. तिसरा राऊंड ‘सिच्युएशन राऊंड’ होता. यात परिक्षकांनी एकेका जोडीसमोर परिस्थिती निर्माण करुन त्यांच्याशी संबंधित प्रश्न विचारले.एका आई- मुलींच्या जोडीला विचारण्यात आले की, जर मुलीसाठी खूप श्रीमंत स्थळ आले आणि त्यांनी लग्नानंतर मुलीला नोकरी करण्यास मनाई केली तर काय करणार? जर कोणी आईचा अपमान केला तर काय कराल? या पद्धतीने विचार करण्यास प्रवृत्त करणाऱ्या प्रश्नांचा सामना स्पर्धकांनी केला. चौथा राऊंड प्रश्नोत्तराचा होता. यात परीक्षकांनी आई आणि मुलीला त्यांच्या ऐकमेकींच्या आवडी- निवडीवर प्रश्न विचारले. स्पर्धेचे परिक्षण अ‍ॅड. संध्या मुसळे आणि सागर अदनकर यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून संगीनी क्लब आॅफ आयएमएच्या अध्यक्षा डॉ. विद्या बांगडे व सचिव डॉ. सिद्धीका शिवजी, लोकमतचे सहा. शाखा व्यवस्थापक विनोद बुले, यांना आमंत्रीत करण्यात आले. स्पर्धेत शहरातील १६ आई-मुलींच्या जोड्यांची निवड आॅडीशनच्या माध्यमातून करण्यात आली. संचालन पूजा ठाकरे यांनी केले. नेहमीच कौटुंबिक विषयांना घेऊन येणाऱ्या कलर्स चॅनलने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. २२ कलर्सवर १९ डिसेंबरपासून सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता आई- मुलींच्या मजबूत नात्यावर ‘एक शृंगार... स्वाभिमान’ या मालिकेचे प्रसारण होत आहे. यात गणिताची शिक्षिका शारदा हिने आपल्या दोन मुलींना आधुनिक विचारांसोबतच स्वाभिमानाने आणि शिकविले. मुलींना कर्मठ करण्यासाठी आधी नोकरी आणि नंतर लग्न करण्याची भूमिका घेऊन शारदा समाजासमोर अनेक प्रश्न निर्माण करते. नौकरी करण्याचा उद्देश केवळ पैसे मिळविणे नसून स्वाभिमानाने जगण्याचा मार्ग आहे. घर सांभाळून नोकरी करणारी स्त्री आदर्श आणि नोकरीच्या द्वारे करिअरला अधिक महत्व देणारी स्त्री आदर्श का नाही? असा प्रश्न शारदा समाजासमोर ठेवते. तिच्या सर्व प्रश्नाची उत्तरे काय आहेत हे या मालिकेत दाखवण्यात आले आहे. ‘आम्ही दोघी मायलेकी’ मध्ये एक दुसऱ्याना समजून घेणाऱ्या आई मुलींच्या जोड्यांना पुरस्कृत करण्यात आले. कार्यक्रमात प्रियंका वरघने यांनी लावणी व नृत्य सादर केले. उपस्थित सखीनी एक मिनिट गेम शोचा आनंद घेतला. (नगर प्रतिनिधी)