शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

वरोरा तालुक्यात रंगीत कापूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 23:46 IST

आजपर्यंत आपण केवळ पांढरा शुभ्र असणाऱ्या कापसाची शेती बघितली आहे. परंतु वरोरा तालुक्यातील चिकणी गावातील एका शेतकऱ्याने रंगीत असलेल्या कापसाची शेती करून कपाशीच्या झाडातून प्रथमच रंगीत कापूस पिकविला आहे.

ठळक मुद्देउत्पन्नही फायद्याचे : चिकणी येथील शेतकऱ्याचा नवा प्रयोग

प्रवीण खिरटकर।आॅनलाईन लोकमतवरोरा : आजपर्यंत आपण केवळ पांढरा शुभ्र असणाऱ्या कापसाची शेती बघितली आहे. परंतु वरोरा तालुक्यातील चिकणी गावातील एका शेतकऱ्याने रंगीत असलेल्या कापसाची शेती करून कपाशीच्या झाडातून प्रथमच रंगीत कापूस पिकविला आहे. यातून त्यांना नफाही अधिक मिळाल्याने हा प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.वरोरा तालुक्यातील चिकणी येथील बालाजी पारधे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. बालाजी पारधे यांनी वर्धा येथील गोखुरी येथून वैजयी देशी वाण असलेल्या कपाशीच्या बियांची खरेदी करून आपल्या चिकणी येथील शेतात ०.१० आर. हेक्टर जागेवर लागवड केली. कपाशीच्या लागवडीपासून फवारणी करताना बालाजी पारधे यांनी रासायनिक खत व कीटकनाशके यांचा वापर टाळला. त्याऐवजी सेंद्रीय खते व रामदेवबाबा निर्मित कीटकनाशकाचा वापर केला. सध्या या कपाशीच्या झाडामधून रंगीत कापूस निघत आहे. सध्या त्यांना दोन क्विंटल रंगीत कापूस निघाला आहे. तो त्यांनी खादी ग्रामोद्योग संघ वर्धा येथे सात हजार रुपये प्रति क्विंटल या दराने विकला. परत त्यांना याच पिकातून रंगीत कापूस निघणार आहे. खर्च वजा जाता त्यांना चांगला नफा मिळाल्याचे बालाजी पारधे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.चिकणी येथील शेतकरी बालाजी पारधे यांनी रंगीत कपाशीची लागवड केली असून ही लागवड प्रायोगिक तत्वावर असल्याने त्यांना दोन क्विंटल उत्पादन झाले.- व्ही.आर. प्रकाश,तालुका कृषी अधिकारी, वरोरा.