शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

घोडपेठ येथे रंगमुक्त व पर्यावरणपुरक होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:29 IST

आयोजनाचे सहावे वर्ष : गुरूदेव सेवा मंडळाचा उपक्रम घोडपेठ : येथे श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने वं. राष्ट्रसंत तुकडोजी ...

आयोजनाचे सहावे वर्ष : गुरूदेव सेवा मंडळाचा उपक्रम

घोडपेठ : येथे श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतेचा आदर्श ठेऊन रंगमुक्त व्यसनमुक्त व पर्यावरणपुरक होळी साजरी करण्यात आली.

मागील सहा वर्षांपासून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. अध्यक्षस्थानी श्री गुरुदेव सेवा मंडळाचे राज्य प्रचारक सेवकराम मिलमिले व प्रमुख पाहूणे म्हणून तालुका प्रचारक नामदेव आस्वले उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते श्री गुरूदेव सेवा मंडळाचे वतीने नवनिर्वाचित सरपंच अनिल खडके, उपसरपंच प्रदिप देवगडे, ग्रा.पं. सदस्य तथा गटनेता ईश्वर निखाडे, ग्रा.पं. सदस्य कांता बोबडे, ज्योती मोरे, रूपाली बावणे, विनोद मडावी, देवा शंखावार आणि सरोजिनी रामटेके यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी गावात रामधून काढून जनजागृती करण्यात आली.

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवकराम मिलमिले व प्रमुख पाहुणे नामदेव आस्वले यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना अभिप्रेत असलेली रंगमुक्त, व्यसनमुक्त आणि पर्यावरणपुरक होळी साजरी करण्याचे आवाहन उपस्थितांना केले. सरपंच अनिल खडके व उपसरपंच प्रदिप देवगडे यांनीसुध्दा समयोचित मार्गदर्शन केले.

याप्रसंगी माजी सरपंच विनोद घुगूल, सामाजिक कार्यकर्ते अशोक येरगुडे, पंढरी बोधे, जामुवंत विरुटकर, विजय माथनकर, चोखोबाजी मोहितकर, संजय घुगूल, वनिता सावे, संध्या नागपूरे, पूष्पा सातपुते, कुसुम कळसकर, वैशाली इूडूरे , अनिता नागपूरे, शकुंतला लोहे आदी उपस्थित होत्या. संचालन संजय घुगल यांनी केले. तर कुसुम कळसकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. घोडपेठ परिसरातील हेटी, चपराडा, चालबर्डी, घोनाड येथे रंगमुक्त होळी साजरी करण्यात आली. घोनाड येथे ग्रामगीतेनुसार रंग विरहित होळी साजरी करण्यात आली. गावातील युवकांनी ग्राम सफाई करून जमा झालेला कचरा होळी म्हणून पेटविण्यात आला. कोणत्याही प्रकारे लाकूड तोड झाली नाही. धुलिवंदनला पहाटे रामधून काढण्यात आली. दरवर्षीप्रमाणे स्त्रियांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. सायंकाळी महाप्रसाद करण्यात आला.