आयोजनाचे सहावे वर्ष : गुरूदेव सेवा मंडळाचा उपक्रम
घोडपेठ : येथे श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतेचा आदर्श ठेवून रंगमुक्त, व्यसनमुक्त व पर्यावरणपूरक होळी साजरी करण्यात आली.
मागील सहा वर्षांपासून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. अध्यक्षस्थानी श्री गुरुदेव सेवा मंडळाचे राज्य प्रचारक सेवकराम मिलमिले व प्रमुख पाहुणे म्हणून तालुका प्रचारक नामदेव आस्वले उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते श्री गुरूदेव सेवा मंडळाच्या वतीने नवनिर्वाचित सरपंच अनिल खडके, उपसरपंच प्रदीप देवगडे, ग्रामपंचायत सदस्य तथा गटनेता ईश्वर निखाडे, ग्रामपंचायत सदस्य कांता बोबडे, ज्योती मोरे, रूपाली बावणे, विनोद मडावी, देवा शंखावार आणि सरोजिनी रामटेके यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी गावात रामधून काढून जनजागृती करण्यात आली.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवकराम मिलमिले व प्रमुख पाहुणे नामदेव आस्वले यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना अभिप्रेत असलेली रंगमुक्त, व्यसनमुक्त आणि पर्यावरणपूरक होळी साजरी करण्याचे आवाहन उपस्थितांना केले. सरपंच अनिल खडके व उपसरपंच प्रदीप देवगडे यांनीसुध्दा समयोचित मार्गदर्शन केले.
याप्रसंगी माजी सरपंच विनोद घुगूल, सामाजिक कार्यकर्ते अशोक येरगुडे, पंढरी बोधे, जामुवंत विरुटकर, विजय माथनकर, चोखोबाजी मोहितकर, संजय घुगूल, वनिता सावे, संध्या नागपुरे, पुष्पा सातपुते, कुसुम कळसकर, वैशाली इडूरे , अनिता नागपुरे, शकुंतला लोहे आदी उपस्थित होत्या. संचालन संजय घुगल यांनी केले. तर कुसुम कळसकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. घोडपेठ परिसरातील हेटी, चपराडा, चालबर्डी, घोनाड येथे रंगमुक्त होळी साजरी करण्यात आली. घोनाड येथे ग्रामगीतेनुसार रंगविरहीत होळी साजरी करण्यात आली. गावातील युवकांनी ग्राम सफाई करून जमा झालेला कचरा होळी म्हणून पेटविण्यात आला. कोणत्याही प्रकारे लाकूड तोड झाली नाही. धुलिवंदनाला पहाटे रामधून काढण्यात आली. दरवर्षीप्रमाणे स्त्रियांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. सायंकाळी महाप्रसाद करण्यात आला.