शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

वसाहतीत घुसला बिबट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 01:26 IST

येथील घोडाझरी सिंचन विभागाच्या कार्यालय व वसाहत परिसरात मंगळवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास बिबट्या शिरला. त्यामुळे कर्मचाऱ्यांत एकच तारांबळ उडाली.

ठळक मुद्देकर्मचाऱ्यांत दहशत : वनविभाग व एसटीपीएसची चमू घटनास्थळी

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदेवाही : येथील घोडाझरी सिंचन विभागाच्या कार्यालय व वसाहत परिसरात मंगळवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास बिबट्या शिरला. त्यामुळे कर्मचाऱ्यांत एकच तारांबळ उडाली. बिबट्याला हुसकावून लावण्यासाठी वनविभागाची चमू घटनास्थळी दाखल झाली. फटाके फोडण्यात आले. मात्र बिबट्या परिसरातील जुन्या क्वॉर्टरमध्ये लपून बसल्याने कर्मचाऱ्यात दहशत कायम आहे.घोडाझरी सिंचन विभागाचा परिसर दोन एकरात विस्तीर्ण आहे. येथे शेकडो झाडे व मोडकळीस आलेले क्वॉर्टर आहेत. त्यामुळे जुन्या क्वॉर्टरमध्ये बिबट्या लपून बसल्याची माहिती असून त्याला पकडण्यासाठी वनविभागाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. दोन दिवसापूर्वी याच बिबट्याने हेटी परिसरातील दोन बकऱ्यांवर ताव मारला होता.घटनास्थळी वनक्षेत्रअधिकारी आर. एस. गोंड, क्षेत्र सहाय्यक एम. एम. करडे व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाने एसटीपीएस चमू सर्च करीत होते. नागरिकांना परिसरात येण्यास मज्जाव करण्यात आल्याने नागरिकांची गेटवर गर्दी झाली होती. मात्र बिबट्या परिसरातच असल्याने त्याच्या हालचालीवर वनविभागाची नजर आहे.उजव्या बाजुला लोनवाही, गडमौशी, जाटलापूर गावे आहेत. डाव्या बाजुला जंगल परिसर आहे. मात्र सिंचन विभागाने संरक्षण भिंत असल्याने त्याला पळता येणे शक्य नाही. त्यामुळे बिबट्याला पकडून जंगलात सोडण्यासाठी भूमिका वनविभागाची आहे. मात्र उशिरापर्यंत बिबट वनविभागाच्या हाती लागला नव्हता.

टॅग्स :Tigerवाघ