शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जमिनीच्या अधिकारासाठी सामूहिक संघर्ष आवश्यक

By admin | Updated: May 5, 2017 00:59 IST

विद्यमान सरकार व मागील सरकारनेसुद्धा जबरानजोतधारकांच्या मागण्यांकडे सतत दुर्लक्ष केले आहे.

महेश कोपूलवार : जबरानजोत कास्तकरांचा संघर्ष मेळावा सिंदेवाही : विद्यमान सरकार व मागील सरकारनेसुद्धा जबरानजोतधारकांच्या मागण्यांकडे सतत दुर्लक्ष केले आहे. वन जमिनी व इतर सरकारी जमिनीवर कित्येक वर्षांपासून वहीवाट करीत असलेल्या कब्जाधारी शेतकऱ्यांना जमिनीचे मालकी पट्टे देण्यास प्रशासन व सरकार टाळाटाळ करीत आहे. अधिकार नाकारुन उलट शेतकरी पीक घेत असलेल्या जमिनीवर सरकार कब्जा करू पाहात आहे, अशा स्थितीत जबरानजोतधारकांनी एकत्र येवून संघर्ष करणे गरजेचे आहे. शेतकरी, शेतमजुरांच्या या लढ्यात किसान सभा सतत त्यांच्या बाजूने उभे राहील, असे आवाहन अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय कौन्सिल सदस्य डॉ. महेश कोपूलवार यांनी केले. सिंदेवाही येथे आयोजित जबरानजोतधारकांच्या विभागस्तरीय संघर्ष मेळाव्यात डॉ. कोपूलवार बोलत होते. महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने विविध एसडीओ कार्यालय, चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय, महाराष्ट्राचे वनमंत्री यांचे कार्यालय, तसेच नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर मोर्चे काढण्यात आले होते. सर्व जबरानजोत कास्तकारांची अपील प्रकरणे सध्या जिल्हाधिकारी कार्यालयात प्रलंबित आहेत. आता आपल्या जबरानजोतधारक शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे पुढील संघर्षाची दिशा ठरविण्यासाठी ३ मे २०१७ रोज बुधवारला कृषी उत्पन्न बाजार समिती सिंदेवाही येथे विभागस्तरीय भव्य संघर्ष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला गडचिरोलीचे माजी जिल्हा परिषद सदस्य अमोल मारकवार, अ‍ॅड. जगदीश मेश्राम, ‘इज्जत से जिने का अधिकार’ अभियानाचे महेश राऊत यांनी जमीन अधिकारावर कायदेशीर मांडणी केली. प्रास्ताविक व संचालन किसान सभेचे नेते व मेळाव्याचे आयोजक कॉ. विनोद झोडगे यांनी केले. या संघर्ष मेळाव्याला सिंदेवाही, ब्रह्मपुरी, सावली, मूल, नागभीड व चिमूर आदी तालुक्यातील जबरानजोतधारक मोठ्या उपस्थित होते. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी विभागीय संघटक श्रीधर वाढई, ब्रह्मपुरीचे तालुका संघटक सुधीर खेवले यांनी अथक परिश्रम घेतले.(पालक प्रतिनिधी) तीन पिढ्यांच्या पुराव्याची गरज नाही वनअधिकार कायदा २००६ ची अंमलबजावणी करीत असताना तीन पिढ्यांचा ताबा असल्याचा पुरावा लागतो, असे चुकीचे कारण प्रशासन सांगत आहे. त्याद्वारे मागील अनेक वर्षांपासून पिढीजात जमिनीवर शेती करुन आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करणाऱ्या हजारो गरीब कास्तकारांचे वनजमिनीचे पट्टे नाकारण्यात आलेले आहेत. आता या जबरानजोत शेतजमिनीवर वन विभाग झाडे लावत आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना त्यांची मेहनत करुन उठीत केलेली जमीन त्यांच्यापासून हिरावून घेतली जाण्याची भीती निर्माण झालेली आहे. त्यातून शेतकऱ्यांमध्ये शासनाप्रती प्रचंड असंतोष आहे. शासनाने या चुकीच्या धोरणापासून माघार घ्यावी, असे आवाहन किसान सभेचे नेते कॉ. अरुण वनकर यांनी केले.