शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नगरपरिषदेत समाविष्ट गावातील सामूहिक नेतृत्व ‘खालसा’

By admin | Updated: May 26, 2017 00:18 IST

नगरपरिषदेच्या माध्यमातून नागभीड नगरपरिषदेत समाविष्ट करण्यात आलेल्या त्या गावांचा विकास होईलही.

प्रत्येक कामासाठी नागभीडची वारी : गावातील सरपंच, उपसरपंच पदे लुप्तघनश्याम नवघडे । लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : नगरपरिषदेच्या माध्यमातून नागभीड नगरपरिषदेत समाविष्ट करण्यात आलेल्या त्या गावांचा विकास होईलही. पण त्या गावांचे सामूहिक नेतृत्व कायमचे हिरावल्या गेले. त्यांचे छोटी-छोटी कामे गावातच होत होती. त्यासाठी त्यांना आता नागभीडलाच यावे लागणार अशा निराशाजनक प्रतिक्रिया नगरपरिषदेच्या निवडणुकीनंतर व्यक्त व्हायला लागल्या आहेत.नागभीड नगरपरिषदेची निवडणूक २४ मे रोजी झाली. या नगरपरिषदेत डोंगरगाव, बाम्हणी, बोथली, चिखलपरसोडी, भिकेश्वर या जर लांबच असलेल्या गावांना लोकसंख्येच्या पूर्ततेसाठी समाविष्ट करून घेण्यात आले. नवखळा, सुलेझरी, तुकुम या गावांचे ठिक होते. ही गावे नागभीडला लागूनच होती. पण बाकी गावांचे काय, असा प्रश्नही यानिमित्ताने विचारला जात आहे. भिकेश्वर-तुकुम-सुलेझरीमधून काँग्रेसने प्रतिक भसीन व भाजपने सचिन आकुलवार या बाम्हणी-डोंगरगाव या प्रभागातून काँग्रेसने दिनेश गावंडे व भाजपने नरेंद्र हेमणे या धनदांडग्यांना रिंगणात उतरविले यातील प्रतिक भसीन, दिनेश गावंडे, नरेंद्र हेमणे हे नागभीडचे रहिवासी आहेत. सचिन आकुलवार सुलेझरीचे सरपंच - उपसरपंच राहिले असले. तरी त्यांचीही कर्मभूमी नागभीडच राहिली आहे. नागभीडच्या उमेदवारांपासून नवखळा आणि बोथली-परोडी हे दोन प्रभाग यावेळेस सुटले असले तरी भविष्यात येणाऱ्या निवडणुकीत या प्रभागावर अतिक्रमण होणार नाही कश्यावरून?भिकेश्वर-तुकुममधून भसीन किंवा आकुलवार, बाम्हणी-डोंगरगावमधून दिनेश गावंडे किंवा नरेंद्र हेमणे निवडून येतील. आपल्या राजकीय बळावर ते या गावांचा विकास करतीलही. पण या गावातील सामूहीक नेतृत्वाला जे ग्रहण लागले ते ग्रहण भविष्यातही सुटण्याची शक्यता नाही. बाम्हणी, डोंगरगाव, भिकेश्वर, बोथली, तुकुम या छोट्या छोट्या ग्रामपंचायती. या गावातील गावकरी आपआपल्या गावातुन सात-सात प्रतिनिधी निवडून द्यायचे. यातील एक सरपंच व्हायचा. एक उपसरपंच व्हायचा आणि हे ७ लोक आपल्या गावचा गाडा हाकायचे. गावातल्या समस्या गावातच सोडवायचे. आता या लोकांना प्रत्येक गोष्टीसाठी नागभीडवर अवलंबून राहावे लागणार आहे. साधा रहिवाशाचा दाखला लागला तरी नागभीडला यावे लागणार आहे. जेथे ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक गावकऱ्यांच्या तक्रारी ऐकण्याच्या मुडमध्ये नसायचा तेथे नगरपरिषदेचा मुख्याधिकारी आमचे खरच ऐकणार काय, अशी संतप्त भावनाही या गावकऱ्यांच्या मनात निर्माण झाली आहे. सरपंच, उपसरपंच आणि ग्रा.पं. सदस्य म्हणून मिरवणारे व गावाचे नेतृत्व करणारे या गावातील हे सामूहिक नेतृत्व आता कायमचे पडद्याआड गेले आहे.