शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात थंडीची लाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 00:00 IST

चंद्रपूरसह जिल्ह्यातील ग्रामीण भागात सध्या थंडीची लाट आली आहे. चंद्रपूरचा पारा १०.८ अंशावर आला असून ब्रह्मपुरीत तर ९.९ अंशापर्यंत पारा घसरला आहे. या हुडहुडीमुळे जनजीवनावरही परिणाम होत आहे.

ठळक मुद्दे ग्रामीण भागातही हुडहुडी : चंद्रपूर १०.८ तर ब्रह्मपुरी ९.९ अंश सेल्सिअस

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूरसह जिल्ह्यातील ग्रामीण भागात सध्या थंडीची लाट आली आहे. चंद्रपूरचा पारा १०.८ अंशावर आला असून ब्रह्मपुरीत तर ९.९ अंशापर्यंत पारा घसरला आहे. या हुडहुडीमुळे जनजीवनावरही परिणाम होत आहे.चंद्रपूर जिल्हा तसा तप्त उन्हाळ्यामुळे राज्यभर प्रसिध्द आहे. उन्हाळ्यात बाहेर जिल्ह्यातील नागरिक चंद्रपुरात यायला घाबरतात, एवढी उन्हाची दाहकता असते. यावर्षी चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाळा चांगलाच तापला. सूर्याचा पारा ४८ अंशापार गेला होता. मात्र त्यानंतर पावसाळ्याने ऋतुचक्राला बगल दिली. प्रारंभी दमदार आलेला पाऊस पुढे कुठे गायब झाला, कळले नाही. पावसाने जिल्ह्यात सरासरीही गाठली नाही. अत्यल्प पावसामुळे शेतकºयांचे मोठे नुकसान झाले. पावसाळ्याने दगा दिला. त्यामुळे मागील वर्षीसारखा हिवाळाही दगा देईल, असे वाटत होते. प्रारंभी तसे वाटायलाही लागले. मात्र पुढे चांगली थंडी पडू लागली. हिवाळ्यात चांगली थंडी पडत असल्याने रबी पिकांना त्याचा फायदा होत आहे.एरवी दिवाळीपासून थंडीला सुरूवात होते. मात्र यावेळी दिवाळी आॅक्टोबर महिन्यातच आल्यामुळे थंडी जाणवली नाही. उलट उन्ह तापत असल्याने अनेकांनी घरातील कुलर काढलेच नाही. नोव्हेंबर महिन्यातही थंडीचा फारसा जोर नव्हता. दुपारचा उकाडा कायम होता. नोव्हेंबरच्या अखेरच्या आठवड्यात थोडीफार गुलाबी थंडी जाणवू लागली. मात्र डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातच थंडीचा अचानक जोर वाढला. डिसेंबरच्या पंधरवाड्यात तर पारा चांगलाच खाली आला होता. पहाटे आणि रात्रीच्या सुमारास कडाक्याची थंडी जाणवू लागली होती.मात्र मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात थंडीची लाट आली आहे. पहाटे आणि रात्रीच्या सुमारास जाणवणारी थंडी आता दिवसभरही जाणवत आहे. चौकाचौकात नागरिक उन्हात उभे राहताना दिसत आहे. शनिवारी चंद्रपुरात १०.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. दिवसेंदिवस पारा आणखी खाली घसरत आहे.ग्रामीण भागात शेकोट्याग्रामीण भागात तर थंडीचा जोर अधिक आहे. ब्रह्मपुरीत शनिवारी ९.९ अंश सेल्सिअसपर्यंत पारा घसरल्याची नोंद झाली आहे. ग्रामीण भागातील चौकाचौकात शेकोट्या पेटवून नागरिक थंडीपासून बचाव करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. याशिवाय एरवी पहाटे५ वाजताच आपली दिनचर्या सुरू करणारे ग्रामीण नागरिक आता सकाळी ७ वाजताउठू लागले आहेत.