शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचे काम बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 23:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत सन २००५ पासून विविध पदांवर शेकडो कंत्राटी आरोग्य कर्मचारी कार्यरत आहे. या कर्मचाऱ्यांच्या पुर्ननियुक्ती प्रक्रियेत बदल करण्यात आल्याने कर्मचाऱ्यांची पिळवणूक होणार आहे. त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांनी एचआर परफॉर्मन्स इंडिकेटरच्या विरोधात सोमवारपासून जिल्हा परिषदेसमोर बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे आरोग्य सेवेवर परिणाम ...

ठळक मुद्देआरोग्य सेवा प्रभावित : सेवेत नियमित करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत सन २००५ पासून विविध पदांवर शेकडो कंत्राटी आरोग्य कर्मचारी कार्यरत आहे. या कर्मचाऱ्यांच्या पुर्ननियुक्ती प्रक्रियेत बदल करण्यात आल्याने कर्मचाऱ्यांची पिळवणूक होणार आहे. त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांनी एचआर परफॉर्मन्स इंडिकेटरच्या विरोधात सोमवारपासून जिल्हा परिषदेसमोर बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे आरोग्य सेवेवर परिणाम होणार आहे.राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी महासंघ जिल्हा शाखा चंद्रपूरचे अध्यक्ष राकेश नाकडे, उपाध्यक्ष विकास वाढई, सचिव सचिन पोडे, कार्याध्यक्ष प्रकाश मोहुर्ले, कोषाध्यक्ष चंद्रशेखर लोणारे आदींचा नेतृत्वात आंदोलनाला सुरूवात करण्यात आली. या आंदोलनात अभियानांतर्गत कार्यरत कर्मचारी व अधिकारी सहभागी झाले आहे. जोपर्यंत शासनस्तरावर ठोस निर्णय होणार नाही तोपर्यंत आंदोनल मागे न घेण्यावर कर्मचाऱ्यांरी ठाम आहेत.२०१२ ला नागपूर अधिवेशन काळात काढण्यात आलेल्या मोर्चात भाजप सरकार सत्तेत आल्यास ग्रामीण आरोग्य अभियानाच्या कर्मचाऱ्यांना शासनसेवत नियमित करण्याचे आश्वासन भाजपने दिले होते. मात्र आता भाजप सरकार सत्तेत असताना आश्वासनाचा सरकारला विसर पडला आहे. त्यामुळे कर्मचाºयांनी आंदोलन सुरू केले असून कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियमित करण्याची मागणी करण्यात आली आहे.अशा आहेत मागण्याशिक्षणाच्या व अनुभवाच्या आधारे नियमित शासन सेवेमध्ये बिनशर्त समायोजन करावे, समायोजन होईपर्यंत समान काम समान वेतन द्यावे, आशा स्वयंसेविका यांना प्रती महिना एकत्रित मानधन देण्यात यावे, सध्या मिळणारे मानधन दुप्पट करण्यात यावे, गटप्रवर्तक यांना २५ दिवसांच्या कामावर आधारीत मोबदला न देता त्यांना एकत्रित मासिक मानधन देण्यात यावे, अशा विविध कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत.६९९ कंत्राटी कर्मचारीराष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत जिल्ह्यात ६९९ कंत्राटी आरोग्य कर्मचारी आहेत. यामध्ये परिचारीका, अधिपरिचारीका, आरोग्य सेविका, वैद्यकीय अधिकारी, लेखापाल, डाटा एन्ट्री आॅपरेटर, तालुका समूह संघटक अशा पदांचा समावेश आहे.