कंपनीमालक गेले कुठे ? : दोन हजार कामगारांवर उपासमारीची पाळीराजुरा : राजुरा विधानसभा क्षेत्रातील विकासाची कडी जुळत असताना मागील दशकात राजुरा विधानसभा क्षेत्रातील जवळपास १० कंपन्या बंद झाल्या. यामुळे दोन हजार कामगारांवर उपासमारीची पाळी आली आहे.कंपन्या सुरू करताना बँकेचे ऋण घेऊन कोट्यवधीची सबसीडी काही कंपन्यांनी हडप करून पसार झाले आहे. त्यामुळे या भागातील सुशिक्षित बेरोजगार आणि ज्याच्या शेतजमिनी या कंपन्यांनी घेतल्या, त्या शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे.नुकतेच कोरपना तालुक्यातील मुर्ली अॅग्रो कंपनीने टाळेबंदी घोषित केली. हजारो कार्यरत कर्मचारी बेरोजगार झाले. याला जबाबदार कोण? कंपनी सुरू करताना एखादा उद्देश असतो आणि कंपनीचा शुभारंभ होतो. कालांतराने ही कंपनी बंद पडते. मग शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या, त्यांच्या मुलांना नोकऱ्या दिल्या असतील तर त्या नोकऱ्या गेल्या. आता हे बेरोजगाार युवक जगणार कसे, हा प्रश्न आहे. कंपनी बंद करण्यात कोण जबाबदार आहे. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. राजुरा तालुक्यातील चुनाळा येथे हरिगंगा सिमेंट कंपनी सुरू झाली. काही काळानंतर बंद झाली. चुनाळा परिसरातील अनेकांच्या जमिनी गेल्या. परिसरातील नागरिकांचे रोजगार गेले. मात्र या कंपनीच्या मालकावर अजूनपर्यंत कोणतीच कारवाई झाली नाही. जोपर्यंत कडक उद्योग धोरण राहणार नाही, तोपर्यंत बेरोजगारांची, शेतकऱ्यांची अशीच थट्टा होत राहील. हरिगंगा सिमेंट कंपनी बंद झाल्यानंतर याच ठिकाणी गुप्ता मेटल सुरू झाले. काही वर्षानंतर मोठा अपघात झाला. अनेकांना प्राण गमवावे लागले. याचीसुद्धा योग्य चौकशी झाली नाही.चुनाळ्यातील असे शेतकरी ज्यांच्या जमिनी गेल्या, त्यांचे हाल झाले आहे. या भागातील नागरिकांची थट्टा होत असताना एक राजकीय नेता पुढे येऊन कंपनी बुडविणाऱ्या मालकावर कारवाईची मागणी करत नाही, फक्त मागणी करून आजच्या काळात काहीच होत नाही, जनहित याचिका टाकावी लागते, हेदेखील पुढाऱ्यांना कळायला हवे.राजुरा विधानसभा क्षेत्रामधील कंपन्यांना शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी देण्याचा करारा झाला. शेतकरी हतबल झाला तरी चालेल; पण कंपन्यांचे हित जोपासले जाते. टॅक्समध्येसुद्धा सुट देण्यात आली. यातून राजकीय नेते कंपन्यांची पाठराखन करीत आहे. (शहर प्रतिनिधी)
राजुरा विधानसभा क्षेत्रातील १० कंपन्या बंद
By admin | Updated: April 14, 2016 01:11 IST