शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

बंद रेल्वे गेटमुळे नागरिक त्रस्त

By admin | Updated: July 30, 2015 00:59 IST

राजुरा रेल्वे गेट बंद असल्यामुळे नागरिकांना अनेक वर्षांपासून अडचणीचा सामना करावा लागत आहे.

देवाडा : राजुरा रेल्वे गेट बंद असल्यामुळे नागरिकांना अनेक वर्षांपासून अडचणीचा सामना करावा लागत आहे. अनेकवेळा हे फाटक बंद राहत असते. या मार्गात अनेक प्राथमिक आरोग्य केंद्र असून देवाडा- चिंचोली, विरुर स्टे. व जिवती तालुक्यातील नागरिक याच मार्गाने जातात.महाराष्ट्राच्या सीमेला तेलंगाणा राज्याची सीमा असून तेलंगाणाच्या रुग्णवाहिकेलाही फाटक उघडेपर्यंत ताटकळत राहावे लागत असते. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. देवाडाच्या २० कि.मी अंतरावर राजुरा मार्गावर एक रेल्वे गेट आहे. या मार्गावरुन नेहमीच मोठ्या प्रमाणात वाहनांचे आवागमन होत असते. मात्र या वर्दळीच्या मार्गावरील रेल्वे गेट नेहमीच अनेकवेळा बंद राहते. त्यामुळे या ठिकाणी अनेक वेळा वाहतुकीची कोंडी निर्माण होते. याचा फटका अनेक नागरिकांना बसत असतो. त्यामुळे रेल्वे गेट सध्या नागरिकांसाठी डोकेदुखीचे ठरले आहे. राजुरा तालुक्यातील ग्रामीण भागात वेगवेगळे ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र असून रुग्णांना उपचार करण्याकरीता त्यांना जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये भरती करण्यात येतो. परंतु आरोग्य केंद्रात औषधीच्या साठा नसल्यामुळे त्यांना पुढील उपचार करण्याकरिता ग्रामीण रुग्णालय राजुरा किंवा जिल्हा रुग्णालय चंद्रपूर येथे हलविण्यात येतो. नेहमीप्रमाणे राजुरा मार्गावरील रेल्वे गेट सतत बंद राहत असल्याने त्या ठिकाणी वाहतुकीची कोंडी निर्माण होते. यासोबतच कॉलेज, शासकीय आयटीआय, एस.टी. महामंडळ आगार, वनविभाग बगिचा, पोलीस विभाग कार्यालय, न्यायमंदिर, तहसील कार्यालयात पोहचण्यात या गेटमुळे अडचणी येत असतात. येथे व्यवस्था करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. (वार्ताहर)