शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

धानोऱ्यातील ‘फिल्टर प्लांट’ बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 22:53 IST

चिचाळा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत आठ गावांना पाणी पुरवठा केला जातो. पाणी शुद्ध करण्यासाठी धानोरा येथे ‘फिल्टर प्लांट’ लावण्यात आले आहे. सदर प्लांट मागील सहा महिन्यांपासून बंद आहे.

ठळक मुद्देआठ गावे तहानलेली : नागरिकांची पाण्यासाठी भटकंती

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चिचाळा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत आठ गावांना पाणी पुरवठा केला जातो. पाणी शुद्ध करण्यासाठी धानोरा येथे ‘फिल्टर प्लांट’ लावण्यात आले आहे. सदर प्लांट मागील सहा महिन्यांपासून बंद आहे. त्यातच दररोज पाईपलाईन लिकेज होण्याचे प्रकार घडत असल्याने परिसरातील आठ गावांमध्ये पाण्याची बोंब सुरु आहे. पाण्यासाठी भटंकती सुरु आहे.चंद्रपूर तालुक्यातील शेणगाव, वेंढली, चिंचाळा, वांढरी, नागाळा, पिपरी, धानोरा आणि सिदूर गावातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने चिचाळा प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सुरु केली. काही वर्षे सुरळीत चाललेल्या या योजनेला आता ग्रहण लागले आहे. योजनेतील पाणी शुद्ध करण्यासाठी धानोरा येथे फिल्टर प्लांट आहे. मात्र हा प्लांट गेल्या सहा महिन्यांपासून बंद आहे. येथे दोन मोटारपंप होते. त्यातील एक चोरी झाली आहे. सध्या एकच सुरुच आहे. पाण्यात ब्लिचिंग पावडर टाकण्यात येत नाही. मोटारपंपाच्या शेजारी मातीचा गाळ जमा आहे. त्यामुळे अशुद्ध पाणीपुरवठा सुरु आहे. फिल्टर प्लांटची देखरेख करण्यासाठी कर्मचाºयांची नियुक्ती करणे आवश्यक होते.मात्र, येथे कोणत्याही कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली नाही. याकडे प्लांटकडे कुणाचेच लक्ष नसल्याने हा प्लांट बंद स्थितीत आहे. या परिसरात उद्योग आहेत. त्यामुळे जडवाहतूक दिवसरात्र सुरु राहते. पाईपलाईनवरुन वाहने गेल्याबरोबर ती लिक होत आहे. ही समस्या दररोजची असल्याने या आठ गावात सध्या पाण्यासाठी बोंबाबोंब सुरु आहे. शेणगाव, वांढरी येथील पाणीपुरवठा महिन्याभरापासून ठप्प आहे.अन्य गावातही कमी जास्त प्रमाणावर अशीच परिस्थिती आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सोमवारी समाजकल्याण सभापती ब्रिजभुषण पाझारे यांच्या कक्षात पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी, आठही गावच्या सरपंच, सचिवांची बैठक पार पडली.या बैठकीत सरपंचानी फिल्टर प्लांट, पाईपलाईन लिकेज, एकच मोटारपंप यासह अन्य प्रश्न मांडून अधिकाºयांना हैराण केले. यावेळी सभापती ब्रिजभुषण पाझारे यांनी उपविभागीय अभियंता पराते यांची चांगलीच कानउघाडणी करुन समस्या सोडविण्यास सांगितले.