शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वातावरणातील बदलामुळे साथीच्या आजारांत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 05:00 IST

हवेतील गारवा, आर्द्रता आणि मध्येच जाणवणारी उष्णता यामुळे संसर्गजन्य आजारांचा जोर वाढल्याचे दिसून येत आहे. गत तीन ते चार दिवसांपासून ढगाळ वातावरणाचा फटका रब्बी पिकांनाही बसण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. वातावरणाच्या बदलामुळे साथीचे आजार बळावले असून, जिल्ह्यातील खासगी व शासकीय रुग्णालये सध्या फुल्ल असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देरुग्णालये फुल्ल : रबी हंगामातील पिकांनाही फटका बसण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सातत्याने होणाऱ्या वातावरणातील बदलांमुळे रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. हवेतील गारवा, आर्द्रता आणि मध्येच जाणवणारी उष्णता यामुळे संसर्गजन्य आजारांचा जोर वाढल्याचे दिसून येत आहे. गत तीन ते चार दिवसांपासून ढगाळ वातावरणाचा फटका रब्बी पिकांनाही बसण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. वातावरणाच्या बदलामुळे साथीचे आजार बळावले असून, जिल्ह्यातील खासगी व शासकीय रुग्णालये सध्या फुल्ल असल्याचे चित्र आहे.जिल्ह्यात ढगाळ वातावरण तसेच पहाटेच्या सुमारास धुके त्यानंतर गारवा, दुपारी काही प्रमाणात उन्ह आणि सायंकाळी पुन्हा गारवा निर्माण होत आहे. वातावरणातील या बदलामुळे बालकांसह नागरिकांचे आरोग्य बिघडत आहे. सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी, प्लेटलेट कमी होणे आदी आजार नागरिकांना जडत आहेत. विशेषत: लहान मुलांना सर्दी, खोकल्याचा त्रास सहन करावा लागत आहे.जिल्हा सामान्य रुग्णालयातही औषधोपचार घेण्यासाठी येणाºयांची संख्या वाढली आहे. सरकारी दवाखान्यात उपचारार्थ दाखल झालेल्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने काही रुग्ण खासगी रुग्णालयात तपासणी करीत आहेत.वातावरणातील बदल लहान बालक आणि वयोवृद्ध नागरिकांना बहुतांशवेळा सहन होत नाही. लहान मुलांना सर्दी, ताप आणि खोकल्याने ग्रासले आहे. शहरातील काही बालरुग्णलयात सध्या गर्दी बघायचा मिळत आहे.खासगी ग्रामीण व शहरी भागातील खासगी रुग्णालयात ताप, अंगदुखी सर्दी, खोकला, विषमज्वर अशा रुग्णांची गर्दी होत आहे. त्यातच काही प्रमाणात हिवतापाचेही रुग्ण दाखल होऊ लागले आहेत. वातावरणातील बदलांशी लहान मुले आणि वयोवृद्ध नागरिकांचे आरोग्य तेवढ्या तत्परतेने जुळवून घेत नसल्याने आरोग्य बिघडत असल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त केले.ग्रामीण भागातील शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. तर काही रुग्ण खासगी डॉक्टरांकडून औषधोपचार करून घेत आहेत. बहुतांश रुग्ण हे व्हायरल फिव्हरचे असल्याची माहिती मिळाली आहे. 

टॅग्स :collegeमहाविद्यालय