शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

महाकाली यात्रेसाठी झरपट नदीची स्वच्छता

By admin | Updated: March 18, 2017 00:38 IST

महाकाली देवी यात्रा काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या पार्श्वभुमीवर गुरूवारी सकाळी ८ वाजता चंद्रपूर शहर ...

मनपाचा पुढाकार : सामाजिक संस्था व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभागचंद्रपूर : महाकाली देवी यात्रा काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या पार्श्वभुमीवर गुरूवारी सकाळी ८ वाजता चंद्रपूर शहर महानगरपालिका, सर्वश्रेष्ठ ज्ञानपीठ सेवा प्रतिष्ठान व सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूरच्या व ग्रिन थिकर व एन.एस.एसच्या वतीने गुरूमाऊली मागील झरपट पात्रात स्वच्छता अभियान राबवून स्वच्छता करण्यात आली. मनपा आयुक्त संजय काकडे, स्थाई समिती सभापती संतोष लहामगे, ज्येष्ठ पत्रकार मुरली मनोहर व्यास, सरदार पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.पी. इंगोले, सहायक आयुक्त अश्विनी गायकवाड, प्रभारी प्रभाग अधिकारी नरेंद्र बोबाटे, स्वच्छता निरीक्षक विवेक पोतनुरवार, प्रा. कुलदीप , कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. उषा खंडाळे, डॉ. प्रा. शरयु पोतनुरवार, प्रा. डॉ. कविता रायपुरकर, प्रा. प्रियंका पाटील, हनमंतु डंभारे, आशिष व्यास व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या प्रमुख उपस्थितीत अभियानास सुरूवात झाली. झरपट नदी पात्रात पसरलेली इकोर्निया वनस्पती काढून पात्र स्वच्छ करण्यात आले. काढण्यात आलेली इकोर्निया वनस्पती वेळीच उचलण्यात आले. या मोहिमेत मनपाचे ७० सफाई कामगार व महाविद्यालयाचे १५० विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. सर्वश्रेष्ठ ज्ञानपीठ सेवा प्रतिष्ठानने या कामात पुढाकार घेत सहकार्य केले. (स्थानिक प्रतिनिधी)यात्रेसाठी पार पडली आढावा सभायात्रेची पुर्वतयारी करण्यासाठी शुक्रवारी महानगर पालिकेच्या स्थायी समिती सभागृहात मनपा आयुक्त संजय काकडे व उपायुक्त विजय देवळीकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा सभा पार पडली. या सभेत यात्रेत येणाऱ्या भाविकांना सोयीसुविधा पुरविण्याच्या दृष्टीने विशेष सुचना देण्यात आले. यावर्षी भाविकांसाठी यात्रेत अ‍ॅक्वागार्ड लावण्यात येणार असून थंड पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे. तसेच स्वच्छता, पाणी पुरवठा, वाहतूक व्यवस्था, निवास व्यवस्था, आंघोळीसाठी शावर व विद्युत व्यवस्था तसेच वादळ व पाऊस आल्यास पर्यायी व्यवस्था या विषयावर सभेत चर्चा करण्यात आली.