शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

झरपट नदी पात्राची लोकप्रतिनिधींनी केली स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 22:51 IST

केंद्र शासनाच्या 'स्वच्छता ही सेवा 'या कार्यक्रमांतर्गत लोकप्रतिनिधींनी शनिवारी झरपट नदीची स्वच्छता केली. या मोहिमेत केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी श्रमदान केले. मोहिमेला करण्यापूर्वी उपस्थितांनी स्वच्छतेची शपथ घेतली. जिल्हा परिषदच्या वतीने तीर्थक्षेत्र वढा येथून उपक्रमाचा शुभारंभ केला.

ठळक मुद्दे'स्वच्छता ही सेवा'अभियानाला सुरुवात : गृहराज्यमंत्र्यांनीही केले श्रमदान

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : केंद्र शासनाच्या 'स्वच्छता ही सेवा 'या कार्यक्रमांतर्गत लोकप्रतिनिधींनी शनिवारी झरपट नदीची स्वच्छता केली. या मोहिमेत केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी श्रमदान केले. मोहिमेला करण्यापूर्वी उपस्थितांनी स्वच्छतेची शपथ घेतली. जिल्हा परिषदच्या वतीने तीर्थक्षेत्र वढा येथून उपक्रमाचा शुभारंभ केला.चंद्रपुरातील गोंड राज्याची राजधानी झरपट नदीच्या काठावर उभी होती. किल्ल्याच्या प्राचीन परकोटाच्या बाहेर वाहणाऱ्या झरपट नदीच्या खोलीकरण आणि विस्तारीकरणाच्या कार्यक्रमाला महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले, आमदार नाना शामकुळे, जिल्हाधिकारी कुणाल खेमणार,  महानगरपालिका आयुक्त  संजय काकडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हेमराजसिंग राजपूत व अन्य पदाधिकारी उपस्थितीत होते. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती पर्वावर आदरांजली अर्पण करून राष्ट्रव्यापी स्वच्छता अभियानाला सुरुवात करण्यात आली.केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर म्हणाले, केद्र्र सरकारने चार वर्षांत राबविलेल्या वेगवेगळ्या उपक्रमांमुळे स्वच्छता अभियान लोकप्रिय ठरले आहे. जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात जागती निर्माण झाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्यानंतर देशातील लाखो कुटुंबांनी शौचालय बांधले. घरोघरी शौचालये बांधणे सोपे काम नव्हते.सरकारने याकरिता मोठी मदत केली. यामध्ये महिला शक्तीचे प्रयत्न व योगदान कौतुकास्पद आहे. भारताच्या प्रतिमेला उजळ करणाºया या मोहिमेबद्दल प्रधानमंत्र्यांनी कौतुक केल्याचेही ना. अहीर यांनी सांगितले. झरपट नदीचे विस्तारीकरण व खोलीकरणाचा संकल्पही यावेळी जाहीर केला.