शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

लोकसहभागातून किल्ल्याची स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 00:39 IST

‘राव न करी ते गाव करी’ अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. याची प्रचिती बल्लारपूर येथील ऐतिहासीक किल्ल्याच्या कचरा सफाई अभियान दरम्यान दिसून आली.

ठळक मुद्देबल्लारपूर पालिकेचा पुढाकार : विविध संघटनांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : ‘राव न करी ते गाव करी’ अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. याची प्रचिती बल्लारपूर येथील ऐतिहासीक किल्ल्याच्या कचरा सफाई अभियान दरम्यान दिसून आली.बल्लारपूर येथे सोळाव्या शतकात गोंडकालीन राजाने वर्धा नदीच्या काठावर किल्ला बांधला. काळाच्या ओघात हा किल्ला जीर्ण अवस्थेत होता. सर्वत्र कचºयाचे साम्राज्य होते, वाढलेल्या झाड-झुडपांमुळे किल्ल्याचे अस्तित्व धोक्यात आले होते. मात्र येथील नगर पालिका प्रशासनाने लोकसहभागातून या ऐतिहासीक किल्याला संजीवनी देण्याचे काम केले आहे.नगर पालिका प्रशासनाने किल्ल्यातील कचरा सफाईच्या कामाला आवाहन केले होते. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या कामाला सुरुवात झाली. यात शहरातील नागगरिक, स्वयंसेवी व सेवाभावी संस्था, लोकमत सखी मंचचे सदस्य, पत्रकार, मैदानी खेळ गाजवणारे आखाड्यातील कबड्डीपट्टू, नगरसेवक, शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने भाग घेतला. जवळपास महिनाभर चाललेल्या या कचरा सफाई अभियानात नगर पालिका कर्मचाºयांचे विशेष योगदान होते. ते महिनाभर सतत या कामात जुपले होते.या कामाचा पाठपुरवठा नगराअध्यक्ष हरीश शर्मा व मुख्याधिकारी विपीन मुद्धा सातत्याने करत होते. आज या किल्ल्याचा कायापालट झाल्याचे जाणवते. किल्ला परत आपल्या मूळ रुपात दिसू लागला आहे. कचरा सफाई अभियानाच्या निमित्ताने अनेक चांगले काम राबिवता येतात, असे येथील नगारिकांनी दाखवून दिले आहे.