शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

इको-प्रोतर्फे बावडी-विहिरीची स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 22:26 IST

इको-प्रो संस्थेच्या वतीने महात्मा गांधी यांच्या १५० व्या जंयतीनिमित्त आयोजीत स्वच्छता पंधरावाडा स्वच्छता ही सेवा अंतर्गत शहरातील एतिहासिक गोंडकालीन बावडी-विहिर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या स्वच्छता अभियानास केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी भेट देऊन पाहणी करीत या उपक्रमाचे कौतुक केले व प्रशासकीय पातळीवर सहकार्य करण्याचे आश्वासन केले.

ठळक मुद्देहंसराज अहीर यांची भेट : प्रशासकीय पातळीवर सहकार्य करणार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : इको-प्रो संस्थेच्या वतीने महात्मा गांधी यांच्या १५० व्या जंयतीनिमित्त आयोजीत स्वच्छता पंधरावाडा स्वच्छता ही सेवा अंतर्गत शहरातील एतिहासिक गोंडकालीन बावडी-विहिर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या स्वच्छता अभियानास केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी भेट देऊन पाहणी करीत या उपक्रमाचे कौतुक केले व प्रशासकीय पातळीवर सहकार्य करण्याचे आश्वासन केले.महात्मा गांधी यांच्या जंयतीनिमित्त देशभरात १५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा अभियान राबविण्यात येत आहे. या राष्ट्रीय स्तरावर सरकारने सुरू केलेल्या अभियानात सहभाग म्हणून शहरातील ऐतिहासिक गोंडकालीन बावडया-विहिरीची स्वच्छता करण्याच्या कामास शनिवारपासून सुरूवात करण्यात आली. सदर विहिर प्राचीन असून शहरातील बऱ्याच ठिकाणी आहेत. मात्र या दुर्लक्षित आणी केरकचरा टाकण्याचे ठिकाण झाले आहे. गोंडराज्य निर्मिती करीत असताना किल्ला-परकोट सह रामाळा तलावासोबत शहरात गोंडकालीन पाणी पुरवठा व्यवस्था अधिक प्रभावीपणे तयार केलेल्या दिसून येतात. मात्र याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे इको-प्रोने पुढाकार घेऊन बाबुपेठ बायपास रोडवरील सोना माता मंदिर, मराठा चैकातील प्राचीन विहिरीपासून स्वच्छता मोहिम सुरु करण्यात आली. या उपक्रमात संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे, इको-प्रो पुरातत्व विभागाचे प्रमुख रवी गुरनुले, नितीन रामटेके, नितीन बुरडकर, बिमल शहा, कपील चैधरी, प्रमोद मलीक, सुमीत कोहळे, राजेश व्यास, मनिष गांवडे, अनिल अडगुरवार, ओमजी वर्मा, राजू हाडगे, जितेंद्र वाळके, हरीश मेश्राम, अमोल उटट्लवार, अतुल रांखुडे, सचिन धोतरे, प्रगती मार्कंडेवार, मनीषा जयस्वाल, पुजा गहुकार, सारीका वाकुडकर, सनी दुर्गे आदी सहभागी आहेत.