शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

नादुरूस्त शौचालयाकरिता स्वच्छ भारत कोष निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 23:49 IST

जिल्ह्यातील गावा-गावात शाश्वत स्वच्छता निर्माण करण्याकरिता जिल्हा परिषद सतत प्रयत्न करीत आहे. गावातील नादुरुस्त शौचालय दुरुस्त करुन वापरात आणाण्याकरिता स्वच्छ भारत कोष मधून लाभार्थ्यास निधी उपलब्ध करुन दिल्या जात आहे. या योजनेमधून लाभार्थ्यास वैयक्तिक शौचालय दुरुस्ती करण्याच्या कामासाठी पाच हजार रूपये आर्थिक मदत केली जात आहे.

ठळक मुद्देलाभ घ्यावा : पाच हजार रूपयांपर्यंत मिळणार अनुदान

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील गावा-गावात शाश्वत स्वच्छता निर्माण करण्याकरिता जिल्हा परिषद सतत प्रयत्न करीत आहे. गावातील नादुरुस्त शौचालय दुरुस्त करुन वापरात आणाण्याकरिता स्वच्छ भारत कोष मधून लाभार्थ्यास निधी उपलब्ध करुन दिल्या जात आहे. या योजनेमधून लाभार्थ्यास वैयक्तिक शौचालय दुरुस्ती करण्याच्या कामासाठी पाच हजार रूपये आर्थिक मदत केली जात आहे.पूर्वीचे संपूर्ण स्वच्छता अभियान योजनेतून दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना ५०० व १२०० चे प्रोत्साहन अनुदान शौचालय बांधकाम करुन वापरणाऱ्या लाभार्थ्यास दिल्या जात होते. आज अशा काही लाभार्थ्यांचे शौचालय मोडकळीस आले असून ते नादुरुस्त अवस्थेत आहेत. आॅनलाईन नादुरुस्त शौचालयाची नोंद आहे, अशा लाभार्थ्यांनी शौचालय दुरुस्त करुन वापरात आणल्यास शासनाकडून स्वच्छ भारत कोष मधून पाच हजार रूपयांपर्यंत मदत केली जात आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाने दिलेल्या प्रपत्रात ग्रामपंचायतीने पंचायत समिती मार्फत जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष येथे अर्ज सादर करणे आवश्यक आहे.प्रस्तावासोबत नादुरुस्त शौचालय व दुरुस्त शौचालयाचा लाभार्थ्यासह असे दोन प्रकारचे छायाचित्र, लाभार्थ्याचे बँक बचत खात्याची झेरॉक्स, यासह ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक यांनी गटविकास अधिकारी यांच्या मार्फत परिपूर्ण प्रस्ताव असणे आवश्यक आहे. जिल्हास्तरावर प्राप्त प्रस्तावाची तपासणी करुन संबंधित लाभार्थ्यांना किंवा ग्रामपंचायतीला निधी शक्य तितक्या लवकर वितरीत केल्या जात आहे.आतापर्यंत नागभीड, ब्रम्हपुरी, मूल व भद्रावती या पंचायत समितीतील ग्रामपंचायतींना निधी वितरीत केला आहे. ग्रामीण भागातील पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याकरिता आपल्या गावच्या ग्रामपंचायत कार्यालयास संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.