शहरं
Join us  
Trending Stories
1
हाँगकाँगमध्ये हाहाकार! २,००० फ्लॅट्सचे गगनचुंबी टॉवर एकाचवेळी पेटले, १३ जणांचा मृत्यू...
2
राम मंदिर ध्वजारोहणावर बोलणं पाकिस्तानवा महागात पडलं, भारतानं आरसा दाखवत गप-गार केलं!
3
उज्ज्वला थिटेंना झटका! राजन पाटलांच्या सुनबाईच अनगरच्या नगराध्यक्ष होणार, न्यायालयात नेमके काय घडले?
4
'ब्लॅक फ्रायडे' म्हणजे काळा शुक्रवार...! मग भरमसाठ डिस्काऊंट देऊन साजरा का करतात कंपन्या...? 
5
Travel : कोल्डड्रिंकपेक्षाही स्वस्त पेट्रोल, इतर गोष्टीही खिशाला परवडणाऱ्या; भारतीयांसाठी व्हिसा फ्री आहे 'हे' बेट!
6
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
7
बिहार काँग्रेसच्या पराभवाची फाईल दिल्लीत उघडणार; ६१ उमेदवार जिल्हावार अहवाल सादर करणार
8
२०२६ ला ५ राशींची अग्निपरीक्षा सुरू, साडेसाती तीव्र होणार; शनि प्रकोप-प्रतिकूल, अखंड सावधान!
9
दत्त जयंती २०२५: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? पाहा, नियम-योग्य पद्धत
10
भारताला २० वर्षांनी पुन्हा मान! शताब्दी 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०३०' चे यजमानपद या शहराच्या पारड्यात...
11
मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...
12
Cyclone Senyar: 'सेन्यार'ने वेग घेतला! दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यावर ७२ तास राहणार मोठा धोका
13
Pune Crime: "तिच्या बेडरुममध्ये झोपवलं आणि..."; कोल्हापुरातील व्यक्तीसोबत पुण्यातील महिलेने काय काय केलं?
14
१० रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, झटक्यात २०% वाढला भाव; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
15
सात जन्माच्या साथीदारानेच केली क्रूरता! पतीमुळे ४ वर्षांच्या चिमुकल्याची आई ९ महिने तडफडत राहिली.. 
16
निवडणूक अधिकाऱ्यांना धोका, आयोगाने बंगाल पोलिसांना पत्र लिहिले; त्या घटनेची आठवून करून दिली
17
सोनिया जी, राहुल जी आन् मी..., कर्नाटक सत्तासंघर्षावर खर्गेंचे मोठे सेंकत! पुढचे 48 तास महत्वाचे; "200% 'तेच' CM होणार"
18
कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय; रेअर अर्थ मॅग्नेट उत्पादनाला भारतात मोठी गती मिळणार
19
मायक्रोसॉफ्टचा बाजार उठणार की काय? गुगल कॉम्प्युटर, लॅपटॉपसाठी आणतेय ऑपरेटिंग सिस्टीम...
20
टीम इंडियाचा दबदबा संपत चाललाय, काही जण तर..; लाजिरवाण्या पराभवानंतर हर्षा भोगलेंनी सुनावलं
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ भारत अभियानात शौचालये हरविले

By admin | Updated: November 22, 2014 00:29 IST

महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनापासून महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील स्वच्छ भारत करण्याकरिता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ भारत अभियाना’ची सुरुवात केली.

राजकुमार चुनारकर खडसंगीमहात्मा गांधी यांच्या जयंतीदिनापासून महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील स्वच्छ भारत करण्याकरिता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ भारत अभियाना’ची सुरुवात केली. मोठमोठे सिलेब्रिटीज, पुढाऱ्यांपासून तर गावखेड्यातील सरपंच्यानी सुद्धा हातात झाडू घेवून देश स्वच्छ करण्याकडे निघाले आहेत. मात्र, निर्मलग्राम पुरस्कार प्राप्त गावात उघड्यावर शौचास बसणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येत असलचयाने चिमूर तालुक्यातील शौचालय स्वच्छ भारत अभियानातही हरविलेत काय? असे चित्र दिसत आहे.मागील सरकारने स्वच्छतेकडून समृद्धीकडेचा नारा देत स्वच्छता अभियान राबवून ग्रामीण भागातील दुर्गंधी दूर करण्याचा प्रयत्न चालविला होता. नंतर याही पुढे जात हागणदारी मुक्त गाव अभियान राबविले. या अभियानामध्ये अनेक गावांनी सहभाग दर्शविला व निकष पूर्ण करुन हागणदारी मुक्तीचे पुरस्कार मिळविले होते. मात्र, आता याच गावांत अस्वच्छता दिसून येते.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगे महाराज ग्रामस्वच्छता अभियान सुरु करुन शासनाने ग्रामीण भागात नागरिकांना स्वच्छतेचे धडे दिलेत. यामध्ये राज्यातील अनेक गावांनी स्वच्छता अभियानाचे शासनाकडून देण्यात येणारे पुरस्कार मिळविले. या अभियानादरम्यान तालुक्यात चांगले काम करुन अभियानातील निकष पूर्ण करणाऱ्या ग्रामपंचायतींना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छता अभियानाचे तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार देण्यात आले.ग्रामस्वच्छता अभियानानंतर शासनाने २००६-०७ पासून हागणदारी मुक्त (निर्मलग्राम) योजना सुरू केली. या अभियानामध्ये ग्रामपंचायत स्तरावर १०० टक्के शौचालय व उघड्यावर शौचास न जाणाऱ्या गावांना हागणदारी मुक्त पुरस्कार देण्यात आले. हागणदारी मुक्त अभियानामध्ये चिमूर तालुक्यातील ९८ ग्रामपंचायतीपैकी बऱ्याच ग्रामपंचायती हागणदारी मुक्त अभियानामध्ये सहभागी झाल्यात.या अभियानात सहभागी झालेल्या तालुक्यातील शिवारपूर, बंदर, शेडेगाव, हिवरा, बोडधा व सावरगाव या गावांना हागणदारी मुक्तीचा ५० हजार ते १ लाख रुपयांचा पुरस्कार राज्याचे पुढारी व अधिकारी यांच्या हस्ते ग्रामपंचायत सचिव, सरपंच यांना देऊन सत्कार करण्याता आला. हागणदारी मुक्त अभियाना दरम्यान तालुक्यात बऱ्याच गावांमध्ये अभियान सुरु असतांना शौचालय असल्याचे दाखविण्यात आले. काही काळासाठी गावातील पांदन रस्ते स्वच्छ झाले. मात्र हागणदारी मुक्तीचा हा संकल्प क्षणाभंगुर ठरला. आजघडीला तालुक्यातील हागणदारी मुक्तीचा फज्जा उडाला असल्याचे चित्र दिसत आहे. हागणदारी मुक्त पुरस्कार प्राप्त गावात आजघडीला गावाच्या शिवेवर हागणदारी मुक्त फलक दिसतो. त्यापुढे गेल्यास रस्त्याच्या दोन्ही बाजूला चित्र वेगळे दिसते. पुरस्कार घेणाऱ्या गावात तरी बाहेर शौचास जाणाऱ्यांची संख्या नगण्य असायला हवी होती. मात्र पुरस्कार प्राप्त शिवापूर, बंदर, शेडेगाव, बोडधा, हिवरा व सावरगाव या गावात हागणदारीचे विदारक चित्र बघायला मिळत आहे. गावात स्वच्छता राहावी, १०० टक्के शौचालयाचा वापर व्हावा याकरिता शासनाने लाखो रुपये खर्च केले होते.