शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
2
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
3
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
4
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
5
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
6
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
7
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
8
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
9
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
10
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
11
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
12
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
13
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
14
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
15
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
16
महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
17
जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही - ट्रम्प
18
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
19
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
20
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 

स्वच्छ भारत अभियानाचा फज्जा

By admin | Updated: April 24, 2015 00:58 IST

देशाचे पंतप्रधान यांनी स्वच्छतेचा मंत्र पुकारत स्वच्छतेकडून समृद्धीकडे नेण्याचा संकल्प केला. या अंतर्गत शासनाने रोगराईवर आळा घालण्यासाठी स्वच्छता किती महत्वाची आहे,

भेजगाव: देशाचे पंतप्रधान यांनी स्वच्छतेचा मंत्र पुकारत स्वच्छतेकडून समृद्धीकडे नेण्याचा संकल्प केला. या अंतर्गत शासनाने रोगराईवर आळा घालण्यासाठी स्वच्छता किती महत्वाची आहे, याचे विविध योजनेतून प्रबोधनातून बाळकडू पाजले. तसे निर्देशही दिले. पण येथील समाजमन स्वच्छतेविषयी जागृत नाही. म्हणून प्रशासनाने राबविलेला स्वच्छता अभियान केवळ कागदावरच असल्याचे चित्र भेजगाव परिसरात पहावयास मिळत आहे.भेजगावात तीन- चार वर्षापूर्वी एकदाच ग्रामस्वच्ता अभियान राबविण्यात आले. तेव्हा गावाचा चेहरा मोहरा बदलला. त्यावेळी गावात तरुणाईची शक्ती पाहायला मिळाली. त्यांच्यातील एकोप्यामुळेच मूल तालुक्यातून भेजगावला स्वच्छतेबाबत प्रथम येण्याचा मानही मिळाला. पुरस्काराच्या याच रकमेतून व लोकवर्गणीतून सार्वजनिक शौचालयाची निर्मिती करण्याचे ठरले व त्यानुसार शौचालयाची निर्मिती करण्यात आली. मात्र या शौचालयाला पुढे उदासीनतेची दृष्ट लागली. आता हे शौचालय बेवारस पडून आहे.ग्रामस्थांना शौचालयाचे महत्व पटवून द्यायचे, स्वच्छतेचा दिंडोरा पिटायचा आणि आपणच त्यासाठी काहीच करायचे नाही, असे समिकरण येथील पदाधिकाऱ्यांनी अवलंबल्यजाचे दिसून येते. लाखो रुपये खर्चून अर्धवट बांधलेले शौचालय ग्रामस्थांना उपयोगात येत नसल्याने ग्रामस्थांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे.संपूर्ण गाव दुर्गंधीने व अस्वच्छतेने बरबटलेले असतानाच उघड्यावरील प्रात: र्विधीमुळे तर मोठे संकट निर्माण झाले आहे. गावागावात भेजगावसारखेच चित्र निर्माण झाल्याने शेवटी स्वच्छतेसाठी लोक चळवळ उभारणे सरकारला क्रमप्राप्त झाले. या चळवळीत अनेक गावे सहभागी झाली. मात्र या चळवळीला कुशल व धोरणी नेतृत्वाचा अभाव असल्याने आज घडीला स्वच्छता अभियान नावापुरतेच मर्यादित राहिले आहे. स्वच्छता ही सर्वांचीच जबाबदारी आहे. हे येथील समाजमन मानायला तयार नाही. घरातील कचरा रस्त्यावर फेकण्याची सवय अजूनही नागरिकांची गेली नाही. म्हणून कचरा वाढत आहे. गावेच्या गावे कचरामय होताना दिसत आहेत.स्वच्छ भारत मिशनमुळे स्वच्छतेची जाणीव प्रत्येकाला व्हायला पाहिजे होती. मात्र ती अद्यापही झालेली नाही. यामुळे आजघडीला स्वच्छता टिकवून ठेवणे लोकांना जमले नाही. परिणामी या योजनेचा फज्जा उडाल्याची चित्र परिसरात दिसून येत आहे. (वार्ताहर)