शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
3
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
4
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
5
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
6
Ganesh Chaturthi 2025:वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
7
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
8
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
9
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
10
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
11
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
12
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
13
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
14
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
15
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
16
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
17
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
18
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
19
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
20
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान

बाजार जागा मोजणीदरम्यान वाद

By admin | Updated: April 9, 2016 01:27 IST

वादग्रस्त आठवडी बाजाराच्या जागेची मोजणी गुरुवारी भूमी अभिलेख कार्यालयाद्वारा करण्यात आली.

असभ्य वर्तणूक : सरपंचांचे पती व सासऱ्यांकडून कामात अडथळाचंदनखेडा : वादग्रस्त आठवडी बाजाराच्या जागेची मोजणी गुरुवारी भूमी अभिलेख कार्यालयाद्वारा करण्यात आली. यात बाजाराच्या हद्दीत इतरासोबतच विद्यमान सरपंचांचे अतिक्रमण आल्याने सरपंचांचे पती व सासऱ्यांनी पदाधिकारी, पत्रकार, मोजणी अधिकारी, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष, बिट अंमलदार यांच्यासोबत शाब्दीक बाचाबाची करून वाद निर्माण केला. संसद आदर्श ग्रामात विद्यमान सरपंचांच्याच कुटुंबीयांकडून असा असभ्य प्रकार घडल्याने संताप व्यक्त केला जात आहे.सर्वे नं. ३८ या ०.५६ आर. असलेल्या आठवडी बाजाराच्या जागेत अतिक्रमण झाल्यामुळे बाजार जागेचे क्षेत्र कमी झाले व त्यामुळे बाजार हा क्षेत्राच्या बाहेर रस्त्याच्या कडेने दुरवर पसरत गेला. परंतु अतिक्रमण हटविण्यापूर्वीच महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प अंतर्गत आठवडी बाजार ओटे बांधकाम मंजूर झाले. जागेची मोजणी केल्यानंतरच ओटे बांधकाम करण्यात यावे, असे बाजार विकास समिती तथा विरोधी गटातील सदस्यांनी सुचविले असता त्यास डावलून मुजोरीने काम सुरू केले. परंतु लगतच्या सर्वे नं. ३८/१ च्या धकाते यांनी शासकीय मोजणी केली असता बांधकाम केलेले ओटे धकाते यांच्या हद्दीत आले व त्यांनी सिमेंटपोल रोवून कंपाउंड केले. यानंतर हा वाद चिघळतच गेला. शेवटी दबावगटामुळे ग्रामपंचायतीने सारवासारव करीत नाईलाजास्तव मोजणीसाठी अर्ज सादर केला. १५ मार्चच्या ग्रामसभेत शासकीय मोजणीत बाजाराच्या जागेच्या हद्दीत आलेले अतिक्रमण काढून बाजाराची जागा मोकळी करण्यात यावी, असे सर्वानुमते ठरविले. त्यानुसार गुरुवारी भूमी अभिलेख उपअधिक्षक डी.जी. थोरात यांच्या मार्गदर्शनात संतोष जुनघरे या मोजणी कर्मचाऱ्यांनी मोजणीस सुरूवात केली असता सरपंचांच्या सासऱ्यानी पत्रकार सदानंद आगबत्तनवार तथा ग्रामविकास समिती अध्यक्ष प्रशांत कोहळे यास शिविगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. यात पत्रकार तथा ग्रामविकास समिती अध्यक्षांनी संयम बाळगून वातावरण निवळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मोजणीत धकाते यांनी यापूर्वी मोजणीनंतर रोवलेले सिमेंट खांब हे योग्य ठिकाणी असल्याचे निदर्शनास येताच सरपंचांचे पती व सासऱ्याकडून वातावरण तापविण्याचा प्रयत्न केला गेला व यात मोजणी थांबविण्यात आली. अखेर तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष बंडू निखाते, उपसरपंच विठ्ठल हनवते, ग्रा.पं. सदस्य, बाजार विकास समिती सदस्य, ग्रामविकास अधिकारी व नागरिकांनी बाजाराच्या जागेची हद्द निश्चित करण्याबाबत मोजणी अधिकारी यांच्यासोबत चर्चा केली. त्यानुसार पुन्हा बाजारस्थळी जावून मोजणीस प्रारंभ करण्यात आला. यात सरपंचांच्या कुटुंबीयांचेच अतिक्रमण दिसून आले. यामुळे संतापून मोजणी सरपंचांचे पती व सासऱ्यांनी अधिकाऱ्यांसोबत हुज्जत घातली व शासकीय कामात अडथळा निर्माण केला. (वार्ताहर)