शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
3
“आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
4
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
5
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
6
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
7
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
8
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
9
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
10
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींचा इच्छापूर्ती काळ, अनपेक्षित लाभ; नफा-फायदा, दसरा भरभराट करेल!
11
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
12
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
13
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल
14
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
15
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख
16
महेश मांजरेकरांची पहिली पत्नी दीपा मेहता यांचं निधन, आईच्या आठवणीत मुलाची पोस्ट
17
दिवाळीपूर्वी मोठी बातमी! फक्त १,२०० रुपयांमध्ये देशात कुठेही विमान प्रवासाची संधी; 'या' कंपनीने आणली ऑफर्स
18
Sheetal Devi : सुवर्णवेध! हातांशिवायही अचूक निशाणा; जागतिक तिरंदाजी स्पर्धेत शीतल देवीला गोल्ड मेडल, रचला इतिहास
19
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
20
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?

शिवसेनेच्या नगरसेवकांचा नगराध्यक्षांना घेराव

By admin | Updated: April 21, 2017 00:58 IST

गेल्या काही दिवसांपासून शहरात पाण्याची समस्या असून नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.

आश्वासनाची पूर्तता नाही : आंदोलनाचा दिला इशारावरोरा : गेल्या काही दिवसांपासून शहरात पाण्याची समस्या असून नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. त्याकरिता विरोधी गट नेता गजानन मेश्राम यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या नगरसेवकांनी शहरातील विविध समस्या सोडविण्यासंदर्भात जनतेला घेऊन नगराध्यक्ष यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता. या मोर्चात शेकडो नागरिक सहभागी झाले होते. मोर्चेकरांना नगराध्यक्ष यांनी सर्व समस्या ३ ते ४ दिवसात सोडविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ८ दिवस होऊनही एकही समस्या मार्गी लागली नसल्याने गुरुवारला नगरसेवक चांगलेच आक्रमक झाले. नगराध्यक्ष साहेब आश्वासन दिले, पण पूर्तता केव्हा करता? असा सवाल उपस्थित करीत नगराध्यक्षांना त्यांनी घेराव घातला.वरोरा शहरातील विविध समस्या सोडविण्यासाठी शिवसेनेच्या नगरसेवकांनी १३ एप्रिलला नगरपालिकेवर शेकडो जनतेला घेऊन मोर्चा काढला होता. गेल्या काही दिवसांपासून शहरातील विविध भागात पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत असून राजीव गांधी वॉर्डात येत्या तीन दिवसात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याचे आश्वासन तसेच जोपर्यंत ट्यूबवेल लावली जात नाही, तोपर्यंत वॉर्डमध्ये टँकरने पाणी देण्याचे चर्चेत ठरले होते. पण ८ दिवस लोटूनही एकही टँकर आले नसल्याचा आरोप नागरसेवकांनी केला आहे. तसेच शहरातील विविध प्रभागातील नाल्या, मोठे नाले यांची सफाई, अनेक वर्षांपासून वॉर्डात राहत असलेल्या नागरिकांना एटॅक्स लागलेला नाही, त्यांना एटॅक्स लावण्याबाबत, तसेच शहरातील पथदिवे बंद अवस्थेत आहे, शहरातील हातपंप बंद अवस्थेत आहे, अनेक कामांचे उदघाटन झाले आहे; पण कामे सुरु झाली नाहीत, अश्या अनेक समस्यांची सोडवणूक करण्यासाठी शिवसेनेने मोर्चा काढला होता व त्यात चर्चे अंती ३ ते ४ दिवसात सर्व समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन नगराध्यक्ष अहेतेशाम अली यांनी नगरसेवकांना दिले होते. मात्र आठ दिवस लोटूनही आश्वासनाची पूर्ती न झाल्यामुळे २० एप्रिलला शिवसेना नागसेवकांनी नगराध्यक्ष यांना घेराव घातला. येत्या सात दिवसात सर्व समस्या निकाली निघाल्या नाही तर शिवसेना मोठे आंदोलन करेल व गरज पडल्यास नागपालिकेला कुलूप ठोकण्यासही मागेपुढे बघणार नाही, असा इशारा देण्यात आला.त्यानंतर नगरसेवकांनी नगराध्यक्षांना समस्यांचे निवेदन सादर केले. यावेळी पंकज नाशिककर, चंद्रकला चिमुरकर, राखी गिरडकर, सन्नि गुप्ता, दिनेश यादव, सुषमा भोयर, प्रणाली मेश्राम , गजानन मेश्राम, राशी चौधरी, राजेश महाजन आदी नगरसेवक उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी )