शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील कामे दर्जेदारच होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 06:00 IST

निकृष्ट कामासंबंधी नागरिकांच्या तक्रारी यापुढे येता कामा नये. दर्जेदार कामे कार्यालयात बसून होणार नसल्याने मनपाच्या झोननिहाय अभियंते, सहाय्यक नगरचनाकार, कनिष्ठ अभियंता यांनी प्रत्यक्ष स्थळावर जाऊन पाहणी करावी अन्यथा कारवाई करण्याचे संकेत महापौर राखी कंचर्लावार यांनी दिले. रस्ते बांधकाम करताना त्या परिसरात अमृत पाइपलाईनचे जोडणीचे कार्य पूर्ण झाले नसेल तर बांधकाम कार्य सुरू करू नये.

ठळक मुद्देमहापौर: मनपाच्या विकास कामांची आढावा बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्र्रपूर : शहरात सुरू असलेल्या विकासकामांच्या गुणवत्तेत कुठेही तडजोड मान्य केल्या जाणार नाही. सर्व कामे दर्जेदारच होणार, अशी ग्वाही महापौर राखी कंचलार्वार यांनी दिली. शुक्रवारी मनपाच्या स्थायी सभागृहात झालेल्या विकासकामांच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या.यावेळी उपमहापौर तथा स्थायी समितीचे सभापती राहुल पावडे, गटनेता वसंत देशमुख, नगरसेवक संदीप आवारी, रवी आसवानी, शहर अभियंता महेश बारई, उपअभियंता अनिल घुमडे, प्रभारी नगररचनाकार आशीष मोरे, रविंद्र हजारे, राजीव पिंपळशेंडे, शाखा अभियंता व सर्व कनिष्ठ अभियंता उपस्थित होते.निकृष्ट कामासंबंधी नागरिकांच्या तक्रारी यापुढे येता कामा नये. दर्जेदार कामे कार्यालयात बसून होणार नसल्याने मनपाच्या झोननिहाय अभियंते, सहाय्यक नगरचनाकार, कनिष्ठ अभियंता यांनी प्रत्यक्ष स्थळावर जाऊन पाहणी करावी अन्यथा कारवाई करण्याचे संकेत महापौर राखी कंचर्लावार यांनी दिले. रस्ते बांधकाम करताना त्या परिसरात अमृत पाइपलाईनचे जोडणीचे कार्य पूर्ण झाले नसेल तर बांधकाम कार्य सुरू करू नये. अमृत नळजोडणीचे काम करावयाचे झाल्यास सदर प्रस्तावित रस्ता पुन्हा फोडण्याची गरज भासता कामा नये, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.भविष्यात कराव्या लागणाऱ्या कामांचा विचार करा. सध्या प्रस्तावित कामांच्या जागेवर जर पुढे जाऊन मोठे काम करता येईल या दृष्टीने नियोजन करावे. रस्त्याच्या बाजूने डक्ट प्रणाली (पोकळी असलेले सिमेंटचे पाईप्स ) करावी. जेणेकरून शहरात भविष्यात येणाºया विविध योजनांच्या लाईन्स यातून नेता येतील. नियोजित कामांच्या जागी किती घरी अमृत नळजोडणीचे काम पूर्ण झाले आहे, याची शहनिशा करून त्याचा अहवाल नियमित द्यावा, अशी सूचनाही त्यांनी केली.अधिकाऱ्यांकडून मागविला अहवालनवीन बांधकाम सुरू असताना रेन वॉटर हार्वेस्टिंगचे बांधकाम सुरु असल्याची खात्री करावी. जिथे मोठे अपार्टमेंट्स व इमारती आहेत त्यांच्या सांडपाण्याची जोडणी पालिकेच्या मुख्य लाईनशी करावी. विकसित भागात पालिकेची मुख्य लाईन नसेल त्या ठिकाणी सोकपीट आहे की नाही याची खात्री करावी. निर्देशित केलेल्या सर्व कामांच्या अंमलबजावणीचा अहवाल येत्या १५ दिवसात देण्याचे निर्देश महापौर राखी कंचलार्वार यांनी सदर बैठकीत दिले.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिका