शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
3
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
4
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
5
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
6
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
7
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
8
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
9
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
10
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
11
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
12
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
13
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
14
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
15
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
16
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
17
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
18
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
19
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
20
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा

नगराध्यक्षांनी द्वेषभावनेतून अतिक्रमण हटविले

By admin | Updated: September 8, 2016 00:44 IST

माझ्या हातात सत्ता आहे; मी आपले संपूर्ण घर पाडू शकतो, अशी धमकीवजा भाषा नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी वापरली.

पत्रकार परिषद : भद्रावतीच्या सरस्वती मोहितकर यांचा आरोपभद्रावती : माझ्या हातात सत्ता आहे; मी आपले संपूर्ण घर पाडू शकतो, अशी धमकीवजा भाषा नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी वापरली. त्यांनी द्वेषभावनेतून अतिक्रमण हटाव मोहिमेच्या नावावर घराची नासधूस केल्याचा आरोप झाडे प्लॉट घुटकाळा येथील रहिवासी सरस्वती मोहितकर यांनी पत्रकार परिषदेत केला.माहिती देताना सरस्वती मोहितकर म्हणाल्या, ६ सप्टेंबर रोजी नगरपरिषदेच्या अतिक्रमण हटाव पथकाद्वारे अतिक्रमण काढत असताना माझ्या घरासह इतरांच्या घरांचे बरेच नुकसान झाले. परंतु, अतिक्रमण हटाव मोहीम ही भेदभावपूर्णरितीने राबविण्यात आली, असे सांगितले. नगर पालिका क्षेत्रातील झाडे प्लॉट घुटकाळा या भागातील बहुतेक लेआऊट हे नगर रचनाकार कार्यालयाकडून मान्यता प्राप्त नसल्याने शेतमालकाने पाडलेल्या प्लॉटनुसार घरांचे बांधकाम झाले आहे. त्यामुळे कुणी अतिक्रमण केले, असे म्हणणे चुकीचे आहे. नगर परिषदेने आधी या भागाची मोजणी करून नंतरच अतिक्रमण हटाव मोहिमेची कारवाई करायला हवी, असे सरस्वती मोहीतकर यांनी यावेळी सांगितले. अतिक्रमण हटविताना नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांना विचारणा केली असता, त्यांनी तुमचे पूर्ण मकान पाडू शकतो; माझ्या हातात सत्ता आहे, अशी त्यांनी भाषा वापरली. लोकसभा निवडणुकीच्या काळात विशिष्ट उमेदवाराचा प्रचार करण्याकरिता पती दिनकर मोहीतकर यांच्यावर दबाव आणला. परंतु, त्यानंतरही प्रचार केला. त्याच काळात अनिल धानोरकर यांनी माझ्याशी विरोध करणे महागात पडेल, असा दम दिला होता, असे सरस्वती मोहितकर यांनी सांगितले. त्यामुळे अतिक्रमण हटविताना भेदभावपूर्ण कारवाई केली. माझ्यासोबत कांताबाई कत्तूरवार, गजानन धांडे यांच्या घरांचेही नुकसान झाले असून या संदर्भात पोलीसात नगराध्यक्ष आणि उपअभियंता यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. न्यायालयातही दाद मागणार असल्याचे सरस्वती मोहीतकर यांनी सांगितले. यावेळी दिनकर मोहीतकर, कांताबाई कत्तूरवार, राकेश कत्तूरवार, विनोद कोळसे, राजू घुगुल, संतोष घुगुल उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)मोहीतकर हे प्लाटधारक नसून ते पाच वर्षापूर्वी ते येथे राहण्यास आले आहे. त्यांनी घर बांधलेल्या जागेतून यापूर्वीच पालिकेची नळ पाईपलाईन आहे. मकान अतिक्रमणात येत असलेल्या चार घरांचे बांधकाम अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान पाडण्यात आले व वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. त्यांची कोणतीही तक्रार नाही. त्यामुळे मोहीतकर यांनी आपणावर केलेले आरोप बिनबुडाचे आहे.- अनिल धानोरकर, नगराध्यक्ष, भद्रावती