शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

एकाच इमारतीच्या छताखालून होणार नागरिकांची कामे

By admin | Updated: September 2, 2015 00:51 IST

राजुरा शहरातील स्वातंत्र्योत्तर काळातील तहसिल कार्यालयाची इमारत जीर्ण अवस्थेत गेली होती.

त्रास होणार दूर : राजुरा तहसील कार्यालयाची इमारत पूर्णत्वास राजुरा : राजुरा शहरातील स्वातंत्र्योत्तर काळातील तहसिल कार्यालयाची इमारत जीर्ण अवस्थेत गेली होती. राजुरा शहरात सुंदर इमारत असावी, येणाऱ्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना सर्व कार्यालयीन कामे एकाच छताखालून व्हावे, यासाठी चार कोटी ५२ लाखांचा निधी राजुराचे तत्कालीन आमदार सुभाष धोटे यांनी खेचून आणला होता. आज या निधीतून प्रशस्त इमारत उभी झाली आहे.कामाचे भूमिपूजन तत्कालीन महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार प्रभाकर मामुलकर यांच्या उपस्थित झाले. आता इमारत पूर्णत्वास येत असून या ठिकाणी एकाच ठिकाणी आठ प्रकारची कार्यालये राहणार आहे. यामध्ये तहसिल कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय, तालुका हत्तीरोग अधिकारी कार्यालय, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, सामाजिक वनीकरण कार्यालयाचा समावेश आहे. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून एकदा आलेला व्यक्ती सर्व प्रकारची कामे करूनच कार्यालयाच्या बाहेर निघणार आहे.ज्या ठिकाणी सुंदर तहसील कार्यालयाची इमारत उभी आहे ती जागा तहसिल कार्यालयाची नव्हती. याची माहिती मिळताच माजी आमदार सुभाष धोटे यांनी तत्कालीन महसुल विभागाचे कमिशनर वेणु गोपाल रेड्डी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून जागा तहसिल कार्यालयाच्या नावाने करून घेतली. यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचेही मोठे सहकार्य मिळाले होते. आज ही इमारत पुर्णत्वास आली आहे. (शहर प्रतिनिधी)संपात विविध संघटनांचा सहभाग चंद्रपूर : उद्या २ सप्टेंबरला विविध संघटनांतर्फे देशव्यापी संप करण्यात येणार आहे. यात विविध संघटनांचा सहभाग आहे. आयटक या राष्ट्रीय कामगार संघटनेच्या वतीने उद्या २ सप्टेंबरला देशव्यापी संप करण्यात येणार आहे. या देशव्यापी संपात राज्य व केंद्र शासनाच्या कामगारांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन येथील आयटकचे पदाधिकारी राजू गैनवार यांनी केले आहे. कामगार कायद्यातील कामगार विरोधी बदल रद्द करण्यात यावा, वाढत्या महागाईला आळा घालावा, बेरोजगारी कमी करावी, उद्योगांना सवलती देताना स्थानिकांना नोकऱ्या देण्यात याव्या या मागण्यांचा समावेश आहे.