शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
3
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
4
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
5
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
6
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
7
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
8
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
9
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
10
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
11
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
12
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
13
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
14
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
15
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
16
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
17
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
18
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
19
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
20
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत

नागरिकांची पाण्यासाठी भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:29 IST

चंद्रपूर : जिल्ह्यातील अनेक गावांत नळयोजना बंद अवस्थेत असून, नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे या योजनांना ...

चंद्रपूर : जिल्ह्यातील अनेक गावांत नळयोजना बंद अवस्थेत असून, नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे या योजनांना निधी मंजूर करून त्या सुरळीत कराव्या, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

आरोग्य केंद्रातर्फे मच्छरदाणी वाटप

देवाडा : जिल्हा आरोग्य विभाग व प्राथमिक आरोग्य केंद्र देवाडाअंतर्गत येणाऱ्या उपकेंद्र परिसरातील सिद्धेश्वर, आनंदगुडा, जंगुगुडा, पारधीगुडा, भेंडवी, सालेगुडा, गेरेगुडा, वरझडी, इसापूर, घोट्टा व गुडे या गावातील नागरिकांना मच्छरदाणीचे आरोग्य कर्मचारी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. डेंग्यू, मलेरियाचा प्रादुर्भाव वाढत आहे.

शेतकऱ्यांना अनुदान वाढवून द्यावे

चंद्रपूर : सरकी ढेपीचे भाव गगनाला भिडल्याने दूध उत्पादक संकटात सापडले आहे. शेतकरी दुग्ध व्यवसायासाठी गायी, म्हशी, शेळ्या आदी जनावरे पाळत आहे. मात्र, वाढत्या महागाईमुळे हा व्यवसाय डबघाईस येत आहे.

वाहनधारकांवर कारवाई करावी

चंद्रपूर : शहरातील अनेक वाहनधारक नियमानुसार नंबर प्लेटवर नंबर न टाकता विविध कलर आणि डिझाइनमध्ये नंबर टाकतात. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

अंगणवाडी सुरू करावी

चंद्रपूर : कोरोना संकटामुळे अद्यापही शाळा सुरु झाल्या नाही. परिणामी, विद्यार्थी गावभर फिरत आहे. मात्र, ग्रामीण भागातील मुलांचे आई-वडील शेतात जात असल्यामुळे मुलांना सुरक्षित कुठे ठेवायचे, हा प्रश्न सध्या ग्रामीण महिलांना पडत आहे. त्यामुळे अंगणवाडी सुरू करून दिलासा द्यावा, अशी मागणी आहे.

बाहेर फिरणाऱ्यांची संख्या वाढली

चंद्रपूर : कोरोनाचे संकट आता काही प्रमाणात कमी झाले आहे. रुग्णसंख्याही घटत आहे. त्यामुळे बाहेर फिरणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे. पहाटेच्या वेळी रस्त्याने मोठ्या संख्येने नागरिक फिरताना दिसत आहे.

जुन्या वाहनांमुळे प्रदूषणात वाढ

घुग्घुस : शहरात कोळसा खाणी, तसेच वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढत आहे. त्यामुळे यावर आळा घालणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे, जुन्या वाहनांद्वारे मोठ्या प्रमाणात धूर निघत असल्याने प्रदूषण वाढले आहे.

बसअभावी प्रवाशांची गैरसोय

शंकरपूर : शंकरपूर-भिसी या मार्गाने एकही बस उपलब्ध नसल्याने बस सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे. भिसी अप्पर तालुका असून, शासकीय कामासाठी येथे जावे लागत आहे, तसेच इतर कामासाठीही नागरिकांना या रस्त्याने जाणे-येणे करावे लागतात. मात्र, बस नसल्याने प्रवाशांना खासगी वाहनाचा आधार घ्यावा लागतो.

बल्लारपूर-सिरोंचा रेल्वे मार्ग तयार करा

बल्लारपूर : येथून सिरोंचापर्यंत रेल्वे मार्ग तयार करण्यात यावा, अशी मागणी चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांकडून होत आहे. बल्लारपूर-सिंरोचा रेल्वे मार्ग तयार झाल्यास नागरिकांना सोईचे होणार आहे.

मातीच्या ढिगाऱ्यावर झुडपे वाढली

गोवरी : राजुरा तालुक्यातील गोवरी, पोवनी, साखरी, सास्ती, गोयेगाव परिसरात वेकोलीने मातीचे महाकाय ढिगारे गावाच्या, शेताच्या लगत टाकले आहे. या ढिगाऱ्यावर झुडपी जंगल निर्माण झाले असल्याने, धोका होण्याची शक्यता आहे.

नाल्यांचा उपसा करण्याची मागणी

सावरगाव : नागभीड तालुक्यातील जीवनापूर येथील नाल्यांचा उपसा न झाल्याने नाल्या सांडपाण्याने तुंबल्या आहे. काही भागांत नालीचे सांडपाणी बाहेर वाहत असते.

शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा

ब्रह्मपुरी : गेल्या सहा-सात दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाल्याने शेतकरी मोठ्या पावसाच्या अपेक्षेने आभाळाकडे डोळे लावून आहेत. या वर्षी हंगामाच्या सुरुवातीपासून पिकायोग्य पाऊस पडत आहे. आवते, पऱ्हे आणि रोवणी वेळेवरच झाली. मात्र, गेली पाच-सहा दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. आता अनेकांना शेतात थोडे तरी पाणी आवश्यक आहे.