शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 23:25 IST

ब्रह्मपुरी तालुक्यातील ग्रामीण परिक्षेत्रांतर्गत येणाºया मुडझा, हळदा, आवळगाव, पद्मापूर-भूज, या गावांमध्ये सध्या विजेचा लपंडाव मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.

ठळक मुद्देकर्मचाºयांचा हलगर्जीपणा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ब्रह्मपुरी तालुक्यातील ग्रामीण परिक्षेत्रांतर्गत येणाºया मुडझा, हळदा, आवळगाव, पद्मापूर-भूज, या गावांमध्ये सध्या विजेचा लपंडाव मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. एकीकडे विजेचा लपंडाव सुरू असतानाही दुसरीकडे मात्र कंबरडे मोडणाºया वीज बिलामुळे नागरिक हैराण झाले आहेत.हळदा, मुडझा, पद्मापूर-भूज, बल्लारपूर ही गावे गांगलवाडी येथील वीज वितरण कंपनीच्या उपकेंद्रात समाविष्ट आहेत. येथून या गावांना विद्युत पुरवठा होत असतो. मात्र येथील कर्मचाºयांच्या लेटलतिफीमुळे व दुर्लक्षामुळे परिसरातील नागरिक त्रस्त आहेत. विशेष म्हणजे, या परिसरातील लोकांना अजूनही आपल्या परिसरातील विद्युत सहायक कोण, याची साधी माहितीही नाही. एखादा ग्राहक गांगलवाडी येथे आपली समस्या घेवून गेल्यास कुठलेतरी कारण समोर ठेवून समस्यांचे निराकरण करण्यास टाळाटाळ केली जाते. प्रत्येक विद्युत सहायकाला वेगवेगळी गावे दिलेली आहेत. मात्र हे विद्युत सहायक फक्त वीज बिल न भरलेल्या ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडीत करायचा असेल तरच येतात. अशा चर्चा गावकºयात आहेत. या विद्युत सहायकांना अधिकाºयांचा कुठलाच धाक नसल्याने परिसरातील विद्युत सेवेचे तीन तेरा वाजले आहे.त्याचप्रमाणे रात्रीच्या सुमारास कमी दाबाची वीज राहत असल्याने घरातील पंखेसुद्धा बंद असल्याची ओरड सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे. वीज पुरवठा वारंवार खंडित होत असतानाच वीज बिले अवाढव्य वाढून येत असल्याने सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक नियोजन कोलमडले असल्याचा सुर आहे. या समस्येचा फटका मात्र वीज ग्राहकांना बसत असताना याकडे विद्युत वितरण विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याची ओरड आहे.