शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्याच्या दैनेमुळे नागरिक त्रस्त

By admin | Updated: August 29, 2015 01:18 IST

राजुरा तालुक्यातील लक्कडकोट महाराष्ट्र तेलंगणा सीमेलगत लक्कडकोट ते गोयेगाव या राष्ट्रीय महामार्गावर मोठ-मोठे खड्डे पडल्यामुळे वाहन चालविणे कठीण झाले आहे.

देवाडा : राजुरा तालुक्यातील लक्कडकोट महाराष्ट्र तेलंगणा सीमेलगत लक्कडकोट ते गोयेगाव या राष्ट्रीय महामार्गावर मोठ-मोठे खड्डे पडल्यामुळे वाहन चालविणे कठीण झाले आहे. बरेच अपघात घडत आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार करुनही दुर्लक्ष होत असल्याने जनतेत तीव्र संपात व्यक्त होत आहे.महाराष्ट्र व तेलंगणा राज्यांना जोडणारा चंद्रपूर-हैद्राबाद हा राष्ट्रीय महामार्ग राजुरा लक्कडकोट मार्गे जातो. हा राष्ट्रीय महामार्ग असल्याने वाहनाची या मार्गावर जास्त प्रमाणात वर्दळ असते. परंतु मागील काही महिन्यापासून या मार्गावर मोठमोठे खड्डे पडलेले आहे. त्यामुळे वाहन घाटावरुन चालवणे म्हणजे मृत्यूशी झुंज दिल्यासारखे आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्र सीमेपर्यंत रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे आहे. त्यानंतरच्या तेलंगाना सीमेपासून त्यांच्या शासनाने उच्च प्रतिचे डांबरीकरण केलेले आहे. त्यामुळे जनतेचा रोष महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. लक्कडकोट ते गोयेगाव या चार किमी अंतरास पाहाडी घाटाचा रस्ता जात असून याच ठिकाणी रस्त्याची पूर्णत: दुर्दशा झालेली आहे. वाहन चालकाना मोठ्या कसरती करत वाहन चालवावे लागत आहे. या खड्ड्यामुळे आतापर्यंत बरेच अपघाताच्या घटना घडलेल्या आहेत. याबाबत सार्वजनिक बांधकामाच्या अधिकाऱ्यांना दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली. परंतु याकडे दुर्लक्ष होत असल्याने जनतेत तिव्र संताप व्यक्त केला जात आहे. १५ दिवसाच्या आत या मार्गाची दुरुस्ती न केल्यास रास्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला.