शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
3
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
4
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
5
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
6
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
7
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
8
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
9
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
10
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
11
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
12
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
13
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
14
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
15
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
16
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
17
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
18
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
19
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
20
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले

अफलातून आदेशाने नागरिकांना झाले हसू की रडू !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 05:00 IST

रात्री ८ ते सकाळी ७ वाजतापर्यंत अघोषित लाॅकडाऊन आहे. या निर्णयावरून नागरिक बुचकळ्यात पडले आहेत. सकाळी ७ ते रात्री ८ वाजता कोरोनाचे संक्रमण होत नाही का? कोरोना रात्रीच आक्रमण करतो का? हे सवाल या आदेशानंतर नागरिकांकडून चर्चिले जात आहे. हा एकप्रकारे विनोदाचा भाग म्हणून विचारात घेतला तरी वस्तुस्थितीही नाकारता येत नाही. 

ठळक मुद्देसकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत कोरोना शांत असतो का?

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना पाहता पाहता चांगलाच वाढायला लागला आहे. या वर्षात सुरुवातीला आठ-दहा रुग्णसंख्या दिवसागणिक वाढत होती. ती आता तीनशेच्या घरात गेली आहे. यावर मात करण्यासाठी दुकानांची वेळ सकाळी ७ ते रात्री ८ वाजतापर्यंतची केली आहे. या जिल्हा प्रशासनाच्या अफलातून आदेशाने नागरिकांना हसू की रडू झाले आहे. काय हो...कोरोना सकाळी ७ ते रात्री ८ वाजतापर्यंत शांत असतो का? या वेळात तो कोणालाच काही करत नाही का? असे नसेल तर ही वेळ निर्धारित करण्याचे काय कारण? या प्रश्नांची नागरिक चवीने चर्चा करीत आहेत.चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. हे कोणीही नाकारू शकत नाही. आताच त्यावर आवश्यक उपयायोजना केली नाही तर या जिल्ह्याची स्थिती नागपूरसारखी व्हायला वेळ लागणार नाही. मात्र यावर कोणतेही उपाय जिल्हा प्रशासनाकडे दिसत नाही. गुरुवारी जिल्हा प्रशासनाने एका आदेशान्वये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व दुकाने, आस्थापना, मार्केट दररोज सकाळी ७ ते रात्री ८ वाजतापर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याचाच अर्थ रात्री ८ ते सकाळी ७ वाजतापर्यंत अघोषित लाॅकडाऊन आहे. या निर्णयावरून नागरिक बुचकळ्यात पडले आहेत. सकाळी ७ ते रात्री ८ वाजता कोरोनाचे संक्रमण होत नाही का? कोरोना रात्रीच आक्रमण करतो का? हे सवाल या आदेशानंतर नागरिकांकडून चर्चिले जात आहे. हा एकप्रकारे विनोदाचा भाग म्हणून विचारात घेतला तरी वस्तुस्थितीही नाकारता येत नाही. नागरिक सकाळी घराबाहेर पडतात. दिवसभर शहरे, गावे गजबजलेली असते. बहुतांश नागरिक रात्री ८ वाजतापर्यंत आपापल्या घरी        जातात. यानंतर केवळ शतपावलीसाठी नागरिक घराबाहेर पडतात.             हा एकच धोका कोरोनाचा संसर्ग होण्याच्या दृष्टीने रात्रीचा                     आहे.  

दिवसा होणाऱ्या संसर्गावर निर्बंधच नाहीसकाळी ७ ते रात्री ८ वाजतापर्यंत दुकाने सुरू ठेवण्यात आली आहे. वास्तविक, याच काळात कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढण्याची भीती आहे. परंतु या काळात कोणतेही निर्बंध नाही. 

‘स्प्रेडर’वर नियंत्रण कसे मिळवाल?कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची संख्या मोठी आहे. ही संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यांचा शोध घेऊन आरटीपीसीआर वा ॲन्टिजेन चाचणी अल्पावधीत व्हावी, यासाठी कोणत्याही उपाययोजना जिल्हा प्रशासनाकडे दिसत नाहीत.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या