शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

विकासासाठी नागरिकांनी योगदान द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 22:35 IST

कधीकाळी अविकसित, मागास आणि प्रदूषण असणारे शहर म्हणून चंद्रपूरला संबोधले जायचे. मात्र आता चंद्रपूरला मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा उपलब्ध करून, नवनव्या योजना आखुन तसेच या शहराचा चेहरा मोहरा बदलणारे अभिनव प्रयोगाद्वारे चंद्रपूरचे नाव देशांमध्ये ओळखले जावे, हा प्रयत्न सुरू आहे.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : चंद्रपुरात विविध विकास कामांचे भूमिपूजन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कधीकाळी अविकसित, मागास आणि प्रदूषण असणारे शहर म्हणून चंद्रपूरला संबोधले जायचे. मात्र आता चंद्रपूरला मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा उपलब्ध करून, नवनव्या योजना आखुन तसेच या शहराचा चेहरा मोहरा बदलणारे अभिनव प्रयोगाद्वारे चंद्रपूरचे नाव देशांमध्ये ओळखले जावे, हा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे येथील लोकप्रतिनिधी व सामान्य नागरिकांनीही विकासाच्या प्रक्रियेत आपले योगदान द्यावे, असे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे विविध विकास कामांचे लोकार्पण भूमिपूजन कार्यक्रम पार पडला. यावेळी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री ना. हंसराज अहीर, आमदार नाना श्यामकुळे, जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, मनपा आयुक्त संजय काकडे, स्थायी समिती सभापती राहुल पावडे आदी उपस्थित होते. मुनगंटीवार पुढे म्हणाले, नागपूर रोडवरील खुल्या जागेचे सौंदर्यीकरण करताना येथील ज्येष्ठ नागरिकांनी नव्याने तयार करण्यात आलेल्या बगीच्याची जबाबदारी घेतली आहे. अनेक ठिकाणी असेच नागरिकांनी पुढे यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच नागरिकांच्या समित्या तयार करुन रस्ते तर सौदर्यीकरण यांच्या दर्जाची काळजी व देखभाल समितीकडे द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी बोलताना गृहराज्यमंत्री अहीर म्हणाले, चंद्रपूरमध्ये मोठ्या प्रमाणात विकास होत असून केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा निधी चंद्रपूरच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात येत आहे. राज्याची तिजोरी ज्यांच्या हाती आहेत असे वित्त मंत्री ना.सुधीर मुनगंटीवार हेच या जिल्ह्याचे पालकमंत्री असल्यामुळे नगरसेवकांकडून आलेल्या कोणत्याही सकारात्मक व दर्जात्मक प्रस्तावाला निधी मिळू शकतो. त्यामुळे झोकून देऊन काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी उपस्थित पाहुण्यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला उपमहापौर अनिल फुलझेले, सभापती जयश्री जुमडे, नगर सेवक वसंत देशमुख, सुभाष कासनगोटुवार, सखीना अंसारी, विना खनके, अनुराधा हजारे, सविता कांबळे, मनपा अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.