शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

ब्रह्मपुरी जिल्ह्यासाठी नागरिक रस्त्यावर

By admin | Updated: August 7, 2016 00:32 IST

ब्रह्मपुरी जिल्हा व्हावा, ही मागणी ब्रह्मपुरी तालुक्यातील नागरिकांसह इतरही गावांनी मागील अनेक वर्षांपासून शासनाकडून रेटून धरली आहे.

कडकडीत बंद : मोर्चात हजारो नागरिकांची उपस्थितीब्रह्मपुरी : ब्रह्मपुरी जिल्हा व्हावा, ही मागणी ब्रह्मपुरी तालुक्यातील नागरिकांसह इतरही गावांनी मागील अनेक वर्षांपासून शासनाकडून रेटून धरली आहे. मात्र प्रत्येक वेळी ब्रह्मपुरीला डावलले जात आहे. अशातच आता शासनाने नवीन जिल्हा निर्मितीचा प्रस्ताव मागितला आहे. मात्र यावेळी अनेक तालुक्यांकडूनही जिल्ह्याची मागणी आहे. यावेळी तरी ब्रह्मपुरीला डावलले जाऊ नये, शासनाने ब्रह्मपुरीचा जिल्ह्यासाठी गांभीर्याने विचार करावा व जिल्ह्याचा दर्जा द्यावा, या मागणीसाठी आज शनिवारी हजारो नागरिक रस्त्यावर आले. यासोबतच ब्रह्मपुरी तालुक्यात कडकडीत बंदही पाळण्यात आला.जिल्हा निर्माण कृती समिती, युवा जिल्हा कृती समिती, ज्येष्ठ नागरिक संघटना, सिनीअर सिटीझन फोरम, महिला आघाडी, व्यापारी मंडळ यांच्यासह सर्वपक्षांचे नेते व कार्यकर्त्यांनी या बंदचे आवाहन केले होते. त्या नुसार, शनिवारी सकाळपासूनच ब्रह्मपुरी शहरासह तालुक्यातील दुकाने, शाळा, महाविद्यालये, भाजी मंडी व इतर प्रतिष्ठाने स्वयंस्फूर्तीने बंद करण्यात आली. शेकडो युवकांनी मोटरसायकल रॅली काढून आपल्या मागणीकडे लक्ष वेधले. त्यानंतर सर्व नागरिक हुतात्मा स्मारकाजवळ एकत्रित आले. महिला, ज्येष्ठ नागरिक, महाविद्यालयीन युवक, नेते, पदाधिकारी, व्यापारी, शेतकरी, शेतमजूर यांचा यात समावेश होता. त्यानंतर तिथूनच मोर्चाला सुरुवात करण्यात आली. सम्राट अशोक चौक, रेणुकामाता चौक, सावरकर चौक आदी मार्गाने घोषणा देत मोर्चा शिवाजी चौकाकडे निघाला. शिवाजी चौकात मोर्चाला अडविण्यात आले. तिथेच उपविभागीय अधिकारी उमेश काळे व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविण परदेशी यांनी मोर्चाला सामोरे जात निवेदन स्वीकारले. मोर्चाचे नेतृत्व माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांनी केले. यावेळी अशोक भैय्या, अ‍ॅड. गोविंद भेंडारकर, अशोक रामटेके, नगराध्यक्ष योगिता बनपूरकर, माजी नगराध्यक्ष रिता उराडे, खेमराज तिडके, माजी आमदार उध्दव सिंगाडे, विनोद झोडगे, प्रा. राजेश कांबळे, सुधीर शेलोकर, हरिश्चंद्र सोले, डॉ. प्रेमलाल मेश्राम, प्रभाकर सेलोकर, डॉ. डी.एन. मेश्राम, सुयोग बाळबुध्दे, प्रतिभा फुलझेले, सर्व नगरसेवक व हजारो नागरिक उपस्थित होते. जिल्ह्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरी तालुक्यातील महिलांची लक्षणीय उपस्थिती दिसून आली. मोर्चात तालुक्यातील तरुणाई उत्साहाने सहभागी झाली होती. त्यांच्या घोषणामुळे ब्रह्मपुरी दुमदुमले. ब्रह्मपुरी जिल्ह्याची मागणी तशी १९८२ पासूनची आहे. परंतु वारंवार शासनाने याकडे वारंवार दुर्लक्षच केल्याचा नागरिकांचा आरोप आहे. याचे पडसाद या मोर्चात उमटले. नागरिकांच्या भावना या मोर्चाच्या निमीत्ताने पुन्हा उफळून आल्या. आता पुन्हा शासन चंद्रपूर जिल्ह्याची विभागणी करण्याच्या विचारात आहे. यावेळी तरी ब्रह्मपुरी जिल्हा घोषित करावा, या मागणीसाठी सर्वपक्षीय मोर्चा आणि बंदचे हे आयोजन होते. पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. (तालुका प्रतिनिधी)आजच्या मोर्चादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. २० पोलीस अधिकारी व २०० च्या वर पोलीस, दंगा नियंत्रक पथक परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविण परदेशी व पोलीस निरीक्षक ओ.पी. अंबाडकर हे वेळोवेळी परिस्थितीची माहिती घेत होते. तरीही विद्यानगर व आमले बी.एड. कॉलेज परिसराच्या रस्त्यावर टायर जाळून मागणीकडे लक्ष वेधण्यात आले.