शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मनपाच्या कारवाईला नागरिकांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 00:07 IST

येथील प्रभाग क्रमांक १६ येथील पाणी समस्या सोडविण्यासाठी लोकवर्गणीतून बोअरवेल खोदण्याचा निर्णय नागरिकांनी घेतला. त्यासंदर्भात मनपाची परवानगी घेऊन बोअरवेलच्या खोदकामाला सुरुवात केली.

ठळक मुद्दे लोकवर्गणीतून बोअरवेलची निर्मिती : परवानगी घेऊनही कार्यवाही

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : येथील प्रभाग क्रमांक १६ येथील पाणी समस्या सोडविण्यासाठी लोकवर्गणीतून बोअरवेल खोदण्याचा निर्णय नागरिकांनी घेतला. त्यासंदर्भात मनपाची परवानगी घेऊन बोअरवेलच्या खोदकामाला सुरुवात केली. मात्र काम पूर्ण झाल्यानंतर मनपाची परवानगी न घेतल्याचे कारण पुढे करुन मनपाचे पथक जप्ती करण्यास प्रभागात दाखल आले. मात्र प्रभागातील नागरिकांनी जप्तीला विरोध केल्यामुळे कर्मचाऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले.शहरातील प्रभाग क्रमांक १६ मधील नागरिकांना दरवर्षी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात भटकंती करावी लागते. येथे नळाचे पाणी नियमित येत नाही. त्यामुळे लोकवर्गणीतून बोअरवेल उभारण्याचा निर्णय येथील नागरिकांनी घेतला. त्यानुसार काम सुरू केले. मात्र, परवानगी न घेतल्याचा ठपका ठेवून मनपा प्रशासनाने काही दिवसाअगोदर साहित्य जप्त करून आठ हजार रूपयांचा दंड ठोठावला.त्यानंतर नागरिकांनी मनपा अधिकाºयांची भेट घेतली. पाणी समस्यमुळे होत असलेला त्रास कथन केला. त्यानंतर लोकवर्गणीतील बोअरवेल पूर्णत्वास येताच मनपाकडे हस्तांतरण करण्यात येईल, असा प्रस्ताव ठेवला. या प्रस्तावाला मनपाने होकार दिला. बोअरवेलचे काम पूर्ण करण्याबाबतचे पत्रही दिले. यानंतर नागरिकांनी अपूर्ण काम पूर्ण केले. मात्र, शुक्रवारी अचानक मनपाचे कर्मचारी जप्तीसाठी धडकले. मात्र मनपाची परवानगी घेऊनही मनपा कर्मचारी जप्तीसाठी आल्याने माजी नरगसेविका रत्नमाला बावणे यांच्यासह परिसरातील नागरिकांनी या कार्यवाहीला विरोध केला. त्यामुळे मनपा कर्मचाऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. मात्र मनपाने पूर्वी परवानगी दिली. नंतर ते काम जप्त करण्यास आल्याने परिसरातील नागरिकांकडून मनपा पदाधिकाºयांबद्दल रोष व्यक्त होत आहे