शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

जननी सुरक्षा योजनेला नागरिकांचा अत्यल्प प्रतिसाद

By admin | Updated: November 22, 2014 22:59 IST

केंद्र शासनाच्या वतीने गर्भवती माता, प्रसूत माता व आजारी बाळांना जिल्हा व तालुका रुग्णालयात उपचार मिळविण्यासाठी जननी सुरक्षा योजना सुरू करण्यात आली आहे. परंतु अर्थसहाय्य अतिशय कमी मिळत

चंद्रपूर : केंद्र शासनाच्या वतीने गर्भवती माता, प्रसूत माता व आजारी बाळांना जिल्हा व तालुका रुग्णालयात उपचार मिळविण्यासाठी जननी सुरक्षा योजना सुरू करण्यात आली आहे. परंतु अर्थसहाय्य अतिशय कमी मिळत असल्याने नागरिकांचा या योजनेस अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे, या योजनेसंदर्भात अधिकाऱ्यांचीही उदासीनता असल्याचा आरोप नागरिकांचा आहे.या योजनेंतर्गत बाळंतिणीला ७०० रुपये मदत दिली जाते. रुग्णालयात बाळंतिणीसोबत राहण्याचा तसेच ये-जा करण्याकरिता येत असलेला खर्च याकरिता ६०० रुपये दिले जातात. परंतु ही मदत गर्भवती महिलेकरिता कमी पडत असल्याने नाराजी व्यक्त केल्या जात आहे. शासनाच्या वतीने जननी सुरक्षा योजनेंतर्गत अर्थसहाय्य वाढविण्याकडे होत असलेले दुर्लक्ष व ग्रामीण भागातून मिळत असलेला अल्प प्रतिसाद यामुळे या योजनेचे सार्थक किती प्रमाणात झाले, असा प्रश्न उपस्थित होत आहे.केंद्राच्या जननी सुरक्षा योजनेचा लाभ आता मातांना दोनपेक्षा अधिक अपत्यांसाठीही मिळत आहे. तसेच आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालयाने लाभार्थी माताच्या वयासाठीची १९ वर्षाची अटही शिथिल केली आहे. यामुळे दारिद्र्य रेषेखालील आणि अनुसूचित जाती व जमातीतील गर्भवती महिला शासकीय दवाखान्यात बाळंत होऊन माता व अर्भक मृत्यू दर कमी होण्यास हातभार लागू शकेल, असा उद्देश होता. त्यामुळे योजनेतील लाभार्थ्यांना मिळणारी सातशे रूपयांची तुटपुंजी रक्कम वाढवण्याची मागणी आहे. आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्रालयाने ८ मे २०१३ रोजी परिपत्रक काढून सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशांना तसे आदेश दिले आहेत. (नगर प्रतिनिधी)