शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

उकाड्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात

By admin | Updated: August 21, 2014 23:47 IST

पाऊस नसल्याने याचा मोठा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे. त्यामुळे शहरात तसेच ग्रामीण भागात दवाखान्यांमध्ये रुग्णांची गर्दी वाढत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे.

रत्नाकर चटप - लखमापूरपाऊस नसल्याने याचा मोठा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे. त्यामुळे शहरात तसेच ग्रामीण भागात दवाखान्यांमध्ये रुग्णांची गर्दी वाढत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे. पावसाळा सुरु होऊन दोन महिन्याचा कालावधी उलटला. परंतु पावसाचा जोर नसल्याने वातावरणात उकाडा दिसून येत आहे. गरमीचे प्रमाण वाढत असून ताप खोकला, सर्दी, हातपायाचे दुखणे, श्वसनाचे रोग आदी आजारांचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. याचा मोठा परिणाम लहान मुलांवर होतांना दिसत आहे. नियमित पाऊस पडत नसल्याने आता काही नागरिक कुलरचा वापर करीत असून उन्हाळा लागला की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यातच काही गावांमध्ये घाणीचे साम्राज्य दिसत असून सांडपाणी वाहत आहे तर नाल्या तुंबून आहे. दरवर्षी पावसाच्या पाण्याने नाल्याची स्वच्छता होवून सांडपाणी गावाबाहेर निघत असे. परंतु अनेक गावात यामुळे रोगांचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. असाच परिणाम जनावरांच्या आरोग्यावरही दिसून येत आहे. यातील अनेक रुग्ण उपचारासाठी नजीकच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी जाताना दिसत आहे. यामध्ये अनेकांना भरती करुन आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. मात्र रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याने डॉक्टरांची तारांबळ उडताना दिसत आहे. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण होवून उष्णतेचे प्रमाण कमी होत असते. परंतु आता पाऊसच नसल्याने याचा परिणाम उलट होतांना दिसत आहे. उकाळ्यामुळे व फळ भाजीपाला महागल्याने आहारावरही परिणाम होत आहे. घराघरात पंखा व कुलर उन्हाळ्याप्रमाणे सुरु असून गरमीपासून सुटका करण्याचे प्रयत्न नागरिक करीत असले तरी पावसाशिवाय पर्याय नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. यातच अनेक शेतकरी, शेतमजूर, कामगार भर उन्हात काम करीत असल्याने अशा रुग्णांची संख्या रुग्णालयात अधिक प्रमाणात दिसत आहे. चांगल्या आरोग्यासाठी चांगले वातावरण असावे असे म्हटले जाते परंतु पावसाच्या ऋतुत दृष्काळाचा सामना करताना आता नागरिकांना आरोग्याचाही सामना करावा लागत आहे.आधीच महागाई वाढली असताना पुन्हा विविध आजार आर्थिक स्थिती डबघाईत आणत आहे. तेव्हा वरुणराजाची कृपा होईल काय, याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागले असून आपले आरोग्य जपण्याचा प्रयत्न नागरिक करीत आहे.