शहरं
Join us  
Trending Stories
1
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
2
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
3
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
4
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
5
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
6
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
7
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
8
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
9
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
10
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
11
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
12
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
13
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
14
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
15
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
16
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
17
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
18
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
19
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

दीडशेवर नागरिकांची आरोग्य तपासणी

By admin | Updated: April 26, 2017 00:46 IST

गडचिरोली जिल्हा पोलीस व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील मुक्तापूर (महागाव) येथे मंगळवारी जनजागरण मेळावा घेण्यात आला.

मुक्तापुरात जनजागरण मेळावा : शेतकऱ्यांना वनहक्क पट्टे व सातबाराचे वितरणअहेरी : गडचिरोली जिल्हा पोलीस व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील मुक्तापूर (महागाव) येथे मंगळवारी जनजागरण मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यादरम्यान झालेल्या आरोग्य शिबिरात दुर्गम भागातील जवळपास दीडशेवर नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे होते. प्रमुख अतिथी म्हणून अहेरीचे पोलीस निरीक्षक संजय मोरे, नायब तहसीलदार चंद्रकांत तेलंग, भूमिअभिलेख कार्यालयाचे संतोष तिरेले, पशुवैैद्यकीय अधिकारी शिंदे, वैैद्यकीय अधिकारी बिश्वास, वनरक्षक घुटे, तलाठी पठाण, ग्रामसेविका भैसारे, प्रकाश दुर्गे, दीपक सुनतकर, कृषी सहायक नंदेश्वर, पोलीस पाटील चंद्रकला कोडापे, सरपंच रमेश मडावी, श्रीहरी आत्राम आदी मान्यवर उपस्थित होते. या मेळाव्यात महसूल, कृषी, आरोग्य, आदिवासी विकास विभाग, वन विभाग, शिक्षण, पशुसंवर्धन, भूमिअभिलेख विभागाच्या वतीने स्टॉल लावून अधिकारी व कर्मचाऱ्यांमार्फत विविध शासकीय योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली. सदर मेळाव्यात मुक्तापूर, महागाव, इतलचेरू या गावातील काही शेतकऱ्यांना वनहक्क जमिनीचे पट्टे व सातबाराचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी रांगोळी, मॅराथॉन, चित्रकला, नृत्य स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेतील विजेत्यांना पोलीस प्रशासनातर्फे पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच मुक्तापूर येथील ग्रामस्थांना दैनंदिन जीवनापयोगी साहित्याचे वितरण करण्यात आले. मोबाईल पॅथॉलॉजी युनिट अहेरी व प्राथमिक आरोग्य केंद्र महागावतर्फे सिकलसेल, बीपी व मधुमेह तपासणी करण्यात आली. वैद्यकीय अधिकारी डॉ. अनुपमा बिश्वास, दीप्ती कोहळे, ललीता उसेंडी, सुनीता पुंघाटी, महागाव पीएचसीच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. अस्मिता गजाटेड्डीवार, सिंधू रायसिडाम यांनी सेवा दिली. प्रास्ताविक पोलीस निरीक्षक संजय मोरे, संचालन पोलीस उपनिरीक्षक कुणाल दुरड यांनी केले तर आभार संतोष पवार यांनी मानले. (प्रतिनिधी)योजनेच्या लाभातून प्रगती साधाशासनाच्या विविध विभागातर्फे गाव विकास व वैयक्तिक लाभाच्या अनेक योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. या योजनेचा लाभ देण्यासाठी पोलीस प्रशासनही आवश्यक ती मदत करेल. त्यामुळे दुर्गम भागातील नागरिकांनी शासकीय योजनाचा लाभ घेऊन आपले कुटुंब व गावाची प्रगती साधावी, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे यांनी मार्गदर्शनात केले.