शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

गडचांदूर पोलीस ठाण्यावर नागरिकांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 23:51 IST

महाशिवरात्रीनिमित्त माणिकगड पहाडाच्या निसर्गरम्य परिसरातील अंमलनाला धरणाजवळील नोकारी (खुर्द) येथे १२ ते १५ फेब्रुवारीदरम्यान श्री शंकर देवाची यात्रा भरणार आहे.

ठळक मुद्देयात्रेपूर्वीच घडला प्रकार : देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षांवर हल्ला

आॅनलाईन लोकमतगडचांदूर : महाशिवरात्रीनिमित्त माणिकगड पहाडाच्या निसर्गरम्य परिसरातील अंमलनाला धरणाजवळील नोकारी (खुर्द) येथे १२ ते १५ फेब्रुवारीदरम्यान श्री शंकर देवाची यात्रा भरणार आहे. गेल्या काही वर्षापासून देवस्थान ट्रस्टमध्ये वादविवाद सुरू असून शुक्रवारी या वादविवादाचे रुपांतर हाणामारीत झाले.या मारहाणीत शंकर देवस्थान सेवा समिती नोकारी (खु) चे अध्यक्ष मोतीलाल शांताराम बदकी (४८) हे जबर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी चंद्रपूर येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सिताराम बदकी हेदेखील जखमी आहेत. प्राणघातक हल्ला करणाºया सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी, या मागणीसाठी रविवारी दुपारी १ वाजताच्या दरम्यान नोकारी येथील शेकडो नागरिकांनी गडचांदूर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला.ठाणेदार विनोद रोकडे यांनी वैद्यकीय अहवाल प्राप्त होताच सर्व आरोपींना तत्काळ अटक करण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर नागरिक परत गेले.शंकर देवाची यात्रा असल्याने साफसफाई करण्यासाठी शुक्रवारी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान शंकर देवस्थान सेवा समितीचे अध्यक्ष मोतीलाल बदकी यांनी मंदिर परिसरात मजूर पाठविले. मात्र आरोपी मोतीलाल मंगाम, शंकर मंगाम, त्यांची पत्नी व मुले यांनी मजूराला काम करु दिले नाही व परत पाठविले. मजुरांनी मोतीलाल बदकी यांना घडलेला प्रकार सांगितला. तेव्हा स्वत: मोतीलाल बदकी व त्यांचा भाऊ सिताराम बदकी व समितीचे सदस्य मंदिराजवळ आले असता वादविवाद सुरु झाला व मोतीलाल बदकी यांच्यावर आरोपींनी हल्ला केला. दगडांनी मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या मोतीलाल यांना ग्रामीण रुग्णालय गडचांदूर येथे दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. पोलीस स्टेशन गडचांदूरला घटनेची तक्रार नोंदविण्यात आली. गडचांदूर पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली. आरोपींना तत्काळ अटक करावी, या मागणीसाठी नोकारी येथील शेकडो पुरुष महिलांनी गडचांदूर पो.स्टे.वर मोर्चा नेला. ठाणेदार विनोद रोकडे यांनी शिष्टमंडळाशी चर्चा केली. वैद्यकीय अहवाल प्राप्त होताच सर्व आरोपींना त्वरित अटक करण्यात येईल असे आश्वासन दले. शंकर देव यात्रेत कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी नोकारीवासीयांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले.यात्रेदरम्यान जादा बसेसची व्यवस्थाश्री शंकर देवाची यात्रा संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध असून या यात्रेत गडचांदूर तथा परिसरातील हजारो भाविक दर्शनासाठी येतात. भक्तांच्या सेवेसाठी गडचांदूर, राजुरा येथून एसटी महामंडळाने स्पेशल बसची व्यवस्था केली आहे. गडचांदूर बसस्टॅड तसेच भाजी मार्केट येथून बसेस, खासगी वाहने सोडण्यात येईल.यात्रेदरम्यान वनविभाग, पोलीस विभागातर्फे कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार असून यात्रा शांततेत पार पाडण्याच्या दृष्टीने चोख बंदोबस्त ठेवला जाणार आहे.- विनोद रोकडे, ठाणेदार