शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

शंकरपूर तालुका निर्मितीसाठी नागरिकांचा एल्गार

By admin | Updated: September 22, 2016 00:58 IST

शंकरपूर तालुक्याच्या मागणीसाठी शंकरपूर तालुका संघर्ष समिती व सर्व पक्षाच्या सहकार्याने बुधवारी तिसऱ्या दिवशीही संपूर्ण व्यापारपेठ बंद ठेवण्यात आली.

तालुका संघर्ष समिती : परिसरात काढली मोटार सायकल रॅली

शंकरपूर : शंकरपूर तालुक्याच्या मागणीसाठी शंकरपूर तालुका संघर्ष समिती व सर्व पक्षाच्या सहकार्याने बुधवारी तिसऱ्या दिवशीही संपूर्ण व्यापारपेठ बंद ठेवण्यात आली. परिसरातील गावांमधून शंकरपूर तालुका संघर्ष समितीच्या वतीने मोटार सायकल रॅली काढण्यात आली. तर गावातील शेतकरी, शेतमजूर, महिला व पुरुषांनी स्वयफूर्तीने काम बंद ठेवून तालुक्याच्या मागणीकरिता हजारोंच्यावर संख्येने गावातून रॅली काढली. शंकरपूर तालुका निर्मितीसाठी शंकरपूर तालुका संघर्ष समिती व व्यापारी संघटनेतर्फे तीन दिवसीय बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार सोमवारी शंकरपूर येथील आठवडी बाजार बंद ठेवण्यात आला व त्यानंतर दुसऱ्या दिवशी शाळा, महाविद्यालये व संपूर्ण व्यापारपेठ बंद ठेवण्यात आली होती. तर तिसऱ्या दिवशी शंकरपूर तालुका संघर्ष समितीच्या वतीने मोटार सायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीत २०० च्या जवळपास मोटार सायकल चालकांनी भाग घेवून शंकरपूर तालुक्यात येणाऱ्या ३५ गावात रॅली काढण्यात आली. या रॅलीच्या माध्यमातून तालुका निर्मीती का आवश्यक आहे, याबाबत विवेचन करून जनजागृती केली. याप्रसंगी महिलांनी भजनाचा कार्यक्रम सादर करून शंकरपूर तालुका झालाच पाहिजे, अशा घोषणा देत संपूर्ण गावातून रॅली काढली व नवचैतन्य निर्माण केले. या रॅलीत अडीच ते तीन हजार महिला, पुरुषांचा सहभाग होता. माजी आमदार डॉ. अविनाश वारजूकर यांनी मार्गदर्शन करून मोटार सायकल रॅलीला समर्थन देत हिरवी झेंडी दाखविली. या रॅलीत जि.प. चे माजी अध्यक्ष डॉ. सतीश वारजूकर, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. विजय टिपले, किशोर जयस्वाल यांनी मोटारसायकल रॅलीत सहभाग घेवून शंकरपूर तालुका निर्मितीबाबत गावागावात मार्गदर्शन केले. परिसरातील साठगाव, कोलारी, जवराबोडी, कवडशी (देश.), किटाळी, हिरापूर, आंबोली, चिचाळा (कुणबी) या गावांनी तालुका निर्मितीसाठी संपूर्ण गावात बंद पाडून तालुक्याच्या मागणीला पाठिंबा दर्शविला. (वार्ताहर)