शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

दिशादर्शक फलकांमुळे नागरिकांची ‘दिशा’भूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 22:21 IST

शहरात अंतर्गत सिमेंट रस्त्याबरोबरच चंद्रपूर- गडचिरोली महामार्गावरील रस्त्याचे बांधकाम केले जात आहे. या महामार्गावरील वाहने जाताना गावांची नावे माहिती व्हावी, यासाठी दिशादर्शक फलक लावण्यात आले. विजय चिमड्यालवार यांच्या राईस मिलजवळील या महामार्गावर लावलेले फलक अज्ञात वाहनाच्या धडकेने तुटलेल्या अवस्थेत आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित कंत्राटदाराचे याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. लाखो रुपये करून लावण्यात आलेल्या दिशादर्शक फलकांची मोडतोड होत असताना प्रशासनाकडे मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याचा नागरिकाांचा आरोप आहे.

ठळक मुद्देअपघाताचा धोका : अपघात टाळण्यासाठी फ लकांची सुधारणा करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कमूल : शहरात अंतर्गत सिमेंट रस्त्याबरोबरच चंद्रपूर- गडचिरोली महामार्गावरील रस्त्याचे बांधकाम केले जात आहे. या महामार्गावरील वाहने जाताना गावांची नावे माहिती व्हावी, यासाठी दिशादर्शक फलक लावण्यात आले. विजय चिमड्यालवार यांच्या राईस मिलजवळील या महामार्गावर लावलेले फलक अज्ञात वाहनाच्या धडकेने तुटलेल्या अवस्थेत आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित कंत्राटदाराचे याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. लाखो रुपये करून लावण्यात आलेल्या दिशादर्शक फलकांची मोडतोड होत असताना प्रशासनाकडे मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याचा नागरिकाांचा आरोप आहे.मूल शहराचा प्रवास स्मार्ट सीटीकडे करण्यासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार विशेष लक्ष देत आहे. कोट्यवधी रुपये खर्च करुन मूल शहराचे बकालपण दूर करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. शहराला दिशा मिळावी, यासाठी चंद्रपूर- गडचिरोली महामार्गाचे सिमेंटीकरण करून मुख्य रस्त्याला नवीन लुक देण्याचा प्रयत्न सुरू केला. यासाठी मुख्य ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात आले.सार्वजनिक बांधकाम उपविभाग मूलअंतर्गत लक्ष्मी कंस्ट्रक्शन कंपनीने रस्त्याचे काम सुरु केले आहे. मात्र शहरातील अंतर्गत बांधकामात येत असलेल्या सिमेंट रस्त्यावर अर्धवट कामे आहेत. त्यामुळे पावसाळ्यात अडणारे पाणी काढणे कठीण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दिशादर्शक फलकाची दुरवस्था झाली.कंत्राटदार व बांधकाम विभागाचे अधिकारी याच मार्गावरुन ये-जा करतात. पण, दुरूस्ती का करीत नाही, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. रात्रीच्या सुमारास हे दिशादर्शक फलक नागरिकांची दिशाभूल करीत आहेत. यामुळे मोठा अपघात होणे अथवा भलत्याच मार्गाने पुढे निघून जाण्याचे प्रकार या मार्गावर घडत आहेत.