शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

देशमुखगुड्यातील नागरिकांनी भीतीपोटी सणाकडे फिरविली पाठ

By admin | Updated: August 21, 2015 01:18 IST

वाढत्या डासांमुळे आणि हातपंपातील दूषित पाण्यामुळे देशमुखगुडा गावात गेल्या १५ दिवसांपासून हिवतापाच्या साथीने अख्खे गावच बेजार झाले आहे.

गावात सर्वाधिक मलेरियाचे रुग्ण : शाळकरी मुलीचा बळी गेल्याने पसरली दहशत

लोकमतआॅन द स्पॉटशंकर चव्हाण/संघरक्षित तावाडे जिवतीवाढत्या डासांमुळे आणि हातपंपातील दूषित पाण्यामुळे देशमुखगुडा गावात गेल्या १५ दिवसांपासून हिवतापाच्या साथीने अख्खे गावच बेजार झाले आहे. याच आजाराची लागण होऊन एका शाळकरी मुलीचा बळी गेल्याने गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वर्षातून एकदा येणारा सणही आम्ही आनंदाने साजरा करू शकलो नाही, अशी खंत देशमुखगुड्यातील नागरिक डोळ्यात अश्रू आणून व्यक्त करीत होते. लोकप्रतिनिधी व प्रशासनाविषयी त्यांच्या मनात संताप दिसून आला. टेकामांडवा ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या देशमुखगुडा गावची लोकसंख्या केवळ ७० असून १२ घरांची वस्ती आहे. हिमायतनगरपासून दोन किलोमिटर अंतरावर असलेल्या या छोट्याशा वस्तीत गेल्या १५ दिवसांपासून मलेरिया या आजाराने नागरिक बेजार झाले आहेत. या गावात आरोग्याच्या कोणत्याही सोयीसुविधा नसून आरोग्य कर्मचारीही कधीच गावात येत नसल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. ग्रामसेवक तर गेल्या वर्षापासून गावात आलाच नाही. येथील लोकांना ये-जा करण्यासाठी पक्क्या रस्त्याची व वाहनाची सोय नाही. आजारी रुग्णांना उपचारासाठी घेवून जाताना मोठी कसरत करावी लागत असल्याचे त्यांनी सांगितले. आजही गावात धुरपताबाई शिवशंकर दुधभाते (४०), अर्चना शिवशंकर दुधभाते (१५), सविता नानासाहेब देशमुख (४०), नितीन नानासाहेब देशमुख (१२), खेडू माणिकराव देशमुख (४०), भाग्यश्री खेडेराव देशमुख (१५), शिला खंडेराव देशमुख (३५), राजश्री गोपाळ देशमुख (६), सुमनबाई शहाजीराव देशमुख (५०), मेघराज खंडेराव देशमुख (१३), आशा शिवशंकर दुधभाते (९), विष्णू शिवशंकर दुधभाते (८), पल्लवी गंगाधर दुधभाते (९), पूजा गंगाधर दुधभाते (१०), महेश गोपाळ देशमुख ९५), जनाबाई शहाजी चौधरी (४५), नंदा विश्वनाथ देशमुख (३५), नानासाहेब पांडुरंग देशमुख (४५), विद्या घुले (५५) यांना मलेरियाची लागण झाली आहे. यामुळे गावातील नागरिकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे. गावातील पथदिवेही पडले बंदपावसाळ्यामुळे गावात केरकचरा व गवताचे प्रमाण वाढले असुन गावालगतच शेती आहे. त्यामुळे या गावात प्रत्येक दिवशी विद्युत पुरवठा असणे आवश्यक आहे. मात्र संबंधित ग्रामपंचायतीकडून याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. दिवाळीला लावलेले पथदिवे खराब झाले. आता येणाऱ्या दिवाळीतच पथदिवे लावणार काय? असा गावकऱ्यांचा सवाल आहे. घर टॅक्स भरण्यासाठी ग्रामपंचायतीकडून नेहमीच सक्ती केली जाते. या गावातून शंभर टक्के घर टॅक्स वसुल केल्या जातो. मग आमच्या समस्या सोडविण्याकडे का दुर्लक्ष केले जाते, असाही त्यांचा प्रश्न आहे. रक्त तपासणी करून आरोग्य विभागाची चमू परतलीदेशमुखगुड्यात आजाराचे थैमान, असे वृत्त लोकमतमध्ये प्रकाशित होताच, आरोग्य विभागाची चमू गावात पोहोचली. रुग्णांच्या रक्ताची तपासणी केली. त्यात २० ते २२ जणांना मलेरिया आजाराने ग्रासले असल्याचे आढळून आल्यानंतर त्यांना गोळ्या देवून चमू परत गेली. ब्लिचिंग पावडरचा वापरच नाहीपावसाळ्याच्या दिवसांत दोन ते तीन दिवसाआड पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतात ब्लिचिंग पावडर टाकावे लागते. मात्र ग्रामपंचायतीने त्याकडे कमालिचे दुर्लक्ष केल्याने पिण्यायोग्य असलेले पाणीही दूषित झाले. त्यामुळे आजाराचे प्रमाण वाढले आहे. आजुबाजूची घाण, केरकचरा यामुळे डासाचे प्रमाण वाढले आहे. याबाबत ग्रामसेवकाशी दूरध्वनीवर संपर्क केला असता, ते म्हणाले, ब्लिचिंग पावडर आम्ही गावात पाठवितो. परंतु ते टाकत नसतील त्याला आम्ही काय करणार. आज पुन्हा मी आमच्या कर्मचाऱ्याला ब्लिचिंग पावडर घेवून पाठवित आहे, असे त्यांनी सांगितले. सणावर आली संक्रांतसर्वत्र मोठ्या उत्साहाने आणि पारंपारिक पद्धतीने नागपंचमीचा सण आणि नागोबाजी पूजा केली जात असताना देशमुखगुडा गावात स्मशान शांतता होती. नागपंचमी सणही साजरा करता आला नसल्याचे गावकऱ्यांनी सांगितेल. १९ आॅगस्ट रोजी देशमुखगुडा गावात भेट देऊन आजारी रुग्णांची रक्त तपासणी केली. तसेच मृत मुलीच्या वडिलांची भेट घेतली. सदर मुलीला आठ दिवसांपासून ताप येत होता. उपचारासाठी जवळच्या शेणगाव येथील खासगी दवाखान्यात नेले होते. मात्र तिच्यावर योग्य उपचार न झाल्याने ती दगावल्याचे समजते. आमचे आरोग्य कर्मचाऱ्यांनी वेळीच गाव भेटी केली असती तर ही घटना टळली असती. आम्ही संबंधित कर्मचाऱ्यांना सतत गाव भेटी करण्यासाठी पत्र दिले असुन आम्ही त्या गावात पुन्हा जाणार आहोत.- डॉ. के.जी. कोरडे, आरोग्य अधिकारी, जिवती