शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

बंदीवानातून राष्ट्रोत्कर्षाला अपेक्षित नागरिक घडावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2019 22:48 IST

जगातील सर्वात मोठी लोकशाही राज्यपध्दती असलेल्या भारत देशात संविधानाने सर्वांना समान अधिकार बहाल केल्यानंतरही कुणी मुक्त तर कुणी बंदीवानाचे जीवन का जगतो, याबाबत चिंतनाची गरज आहे.

ठळक मुद्देहंसराज अहीर : चंद्रपूर जिल्हा कारागृहात सत्कार कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जगातील सर्वात मोठी लोकशाही राज्यपध्दती असलेल्या भारत देशात संविधानाने सर्वांना समान अधिकार बहाल केल्यानंतरही कुणी मुक्त तर कुणी बंदीवानाचे जीवन का जगतो, याबाबत चिंतनाची गरज आहे. संयम गमावला, क्रोधावर मात करण्यास अपयश आले हेतुत: गुन्हा घडला किंबहुना अजानतेपणी अपराध झाला, यासाठी शिक्षा ही ठरलीच आहे. त्यामुळे क्रोधावर नियंत्रण व सद्सदविवेकी वर्तणूकीतून गुन्हेगारीवर मात करावी, व राष्ट्राच्या उत्कर्षाला हातभार लावणारे नागरिक आपल्यामधून घडावे, अशी भावना केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा कारागृहात कार्यक्रम पार पडला. यावेळी उत्कृष्ठ कामगीरी बजाविणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आ. नाना श्यामकुळे, अ‍ॅड. दत्ता हजारे, नगरसेविका शितल कुळमेथे, कारागृह अधीक्षक वैभव आत्राम आदी मान्यवर उपस्थित होते.अहीर पुढे म्हणाले, काश्मिर वगळता देशातील सर्वांना कुठेही नोकरी व्यवसाय करण्याची, मुक्त जीवन, संचाराची मुभा आहे. असे असतांना आपण बंदीवानांचे जीवन का जगतो आहे, असा मनाशी विचार करण्याचा चिंतनाचा हा पवित्रा दिवस आहे असे ते म्हणाले.भारत देश अनेक महान विभुंतीच्या परिसस्पर्शाने कर्तृत्वाने पुणीत झालेला आहे. इथे राम, श्रीकृष्ण, भगवान बुध्द, महावीर, गुरूनानक जन्मले त्यांची वाणी आणि विचारातून हा देश घडला आहे. त्यांच्या विचारवाणीतून अपराध मुक्त भारताची संकल्पना साकार करण्याचा प्रयत्न संकल्प प्रत्येक व्यक्तीने केला तर देशाचे स्वरूप बदलेल असे ते म्हणाले. आजच्या दिवशी प्रत्येक बंदीवान बांधवांनी प्रण करावा की, दुसºयांदा या ठिकाणी येवू तर जीवनमुल्ये शिकविणारे मार्गदर्शक म्हणूनच येऊ, असे आवाहन केले. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अनेकांची उपस्थिती होती.