शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

दूरच्या प्रवासात मोबाईलवर पाहता येणार सिनेमा

By admin | Updated: April 18, 2017 00:50 IST

खासगी प्रवासी बस सेवेच्या स्पर्धेत उतरण्यासाठी आता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळही (एस.टी.) सज्ज झाले आहे.

राज्य परिवहन महामंडळाचा नवीन उपक्रम : प्रवाशांना मिळणार वायफाय फ्री आशिष घुमे वरोराखासगी प्रवासी बस सेवेच्या स्पर्धेत उतरण्यासाठी आता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळही (एस.टी.) सज्ज झाले आहे. हल्ली प्रवाशांचा लोंढा खासगी वाहतुकीकडे ओढला जात असल्याने एस.टी.ला होत असलेला तोटा भरून काढण्यासाठी एस.टी.ने नवीन उपक्रम सुरु केला आहे. लांब टप्प्याच्या प्रवासाला जाणाऱ्या बसमध्ये एस. टी.ने मोफत वायफाय सुविधा सुरु केली असून त्यात आपल्या मोबाईलवर विनाडेटा सिनेमा व व्हिडिओ गाणे पाहता येणार आहे .पूर्वी कोणत्याही गावातून कोठेही जाण्याचे सुलभ साधन म्हणून लाल डबा (एस. टी. बस ) व रेल्वेगाडी समजली जात होती. पण आता खाजगी बस कंपन्यांनी (ट्रॅव्हल्स) शासकीय प्रवासी वाहतुकीशी स्पर्धा करीत प्रवासी खेचणे सुरू केले आहे. खासगी ट्रॅव्हल्सने तिकिटाच्या पैशात एसी कोच, व्हिडिओ, वायफाय आणि सोबत थंड पाण्याची बाटली आदी सुविधा देण्यात येत आहेत. त्यामुळे प्रवाशांनी लांब टप्प्याच्या प्रवासासाठी खासगी ट्रॅव्हल्सला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे राज्य परिवहन महांडळाला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.शहरी प्रवाशी ट्रॅव्हल्सकडे वळले तरी ग्रामीण भागातील नागरिक ‘जुने ते सोने’ म्हणत आणि सुरक्षित प्रवास समजून एस.टी. बसची वाट पाहात असतात. ग्रामीण भागात एस.टी.ला अद्यापपर्यंत पर्याय उभा राहिलेला नाही. त्यांच्या सोबतीला शालेय विध्यार्थी आणि सरकारी कर्मचारीही नियमित असतात. कालानुरूप एस.टी. बसमध्ये बदल झाला. खासगी ट्रॅव्हल्सप्रमाणे एस.टी.च्या बसेस आल्या. सर्व गोष्टी सोयीच्या झाल्या. त्यातून प्रवास सुखकर झाला. आता त्यात नवीन तंत्रज्ञानाची भर पडली आहे. नवीन उपक्रम सुरु केला असून एसटीचा प्रवासही मनोरंजनात्मक, सुखकर, सुरक्षित झाला आहे. या बसमध्ये मोफत वाय-फाय सुविधा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यात परिवहन मंडळाला सुगीचे दिवस येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ‘वाय-फाय’चा वापरएस.टी.बसमध्ये बसल्यानंतर आपल्या स्मार्टफोनमधील वायफाय सुरू करावे लागते. त्यात स्क्रीनवर "‘्र५्र" असे लिहून आलेले दिसेल. त्याला क्लिक केल्यावर डेटा कनेक्ट होईल. त्यानंतर ब्राऊसरमध्ये जाऊन ‘्र५्र.ूङ्मे आॅन करावे. त्यावरून मोफत बाय-फायचा आनंद घेता येईल. त्यावर प्रवासात सिनेमा बघा, गाणे बघा आणि बरेच काही.