शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

प्राथमिक शिक्षकांच्या समस्यांवर मंथन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 22:39 IST

जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नासाठी जिल्हा परिषद चंद्रपूरच्या वतीने महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती सोबत समस्या निवारण सभा जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या कक्षात नुकतीच पार पडली. यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी दिपेद्र लोखंडे, मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी खारतुडे आदी उपस्थित होते.

ठळक मुद्देजि.प अध्यक्षाची उपस्थिती : समस्यांचे निराकरण करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नासाठी जिल्हा परिषद चंद्रपूरच्या वतीने महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती सोबत समस्या निवारण सभा जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या कक्षात नुकतीच पार पडली. यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी दिपेद्र लोखंडे, मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी खारतुडे आदी उपस्थित होते.पोंभुर्णा, जिवती, चिमूर व ब्रह्मपुरी तालुक्यात प्रशासनाच्या दिरंगाईमुळे शिक्षकांचे वेतन विहित वेळत होत नाही. डिमांड वेळेवर पाठविण्यात येत नाही. बिले सादर करण्यास कुचराई करण्यात येते, शिक्षकांचे समायोजन करताना २०१५चा शासन निर्णय दुर्लक्षित केल्यामुळे अनेक शिक्षक अतिरिक्त झाले. तसेच याबाबतच्या सुचना तालुक्यांना दिल्या नसल्याने तालुका निहाय समायोजन पद्धतीत मोठा फरक पडला असल्याचा आरोपही संघटनेने केला केला. दरम्यान जि. प. अध्यक्षांनी जोपर्यंत शिक्षकांची बिले होत नाही. तोपर्यंत लिपिकांना वेतन देऊ नये, असे निर्देश दिले.विषय शिक्षक व अन्य पदोन्नती विषयात विस्तार व केंद्र प्रमुख यांच्या पदोन्नतीच्या जागा रिक्त नसल्याने त्यांच्या जागी भरती घेता येणार नाही. मुख्याध्यापकबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच विषय शिक्षकांच्या जागा भरण्याबाबत ३० सप्टेंबरपूर्वी कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच अन्यायग्रस्तांबाबत चौकशी करून न्याय देऊ तसेच संचमान्यतेबाबतच्या असलेल्या त्रुटी दूर करु, वरिष्ठ श्रेणीची प्रलंबित फाईल तात्काळ निकाली करण्यात येईल, बदली प्रकरणातील ज्या तक्रार आहेत. त्या काही प्रमाणात निकाली निघाल्या असून उर्वरित प्रकरणावर कारवाई सुरू आहे, असल्याचे सांगितले. तसेच उपस्थित कर्मचाऱ्यांना एका तारीख ठरवून संपूर्ण करावाई करावी, सेवापुस्तक पडताळणीसाठी कॅम्प लावावे, अशा सूचना दिल्या. यावेळी संघटना प्रतिनिधी विजय भोगेकर, नारायण कांबळे, अल्का ठाकरे, दीपक वरहेकर, हरीश ससनकर, रवी सोयाम, निखिल तांबोळी उपस्थित होते.