शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
2
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
3
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
4
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
5
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
6
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
7
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
8
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
9
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
10
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
11
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
12
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
13
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
14
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
15
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
16
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
18
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
19
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
20
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...

ख्रिसमस निमित्त चर्चमध्ये आनंदाला उधाण

By admin | Updated: December 25, 2016 01:18 IST

ख्रिस्त जन्मानिमित्त नाताळसाठी शहरासह जिल्ह्यातील सर्व चर्चमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

ख्रिस्त जन्म सोहळा : विविध कार्यक्रमांचे आयोजन चंद्रपूर : ख्रिस्त जन्मानिमित्त नाताळसाठी शहरासह जिल्ह्यातील सर्व चर्चमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ख्रिसमसच्या खरेदीसाठी दुकानांमध्ये गर्दी वाढली आहे. ख्रिस्त जन्म सोहळा शनिवार रात्रीपासून सुरू होत आहे. रविवारी सकाळी व सायंकाळी कार्यक्रम राहणार आहेत. चंद्रपूर शहरात सेंट अँड्र्यूस अर्थात संत आंद्रिया चर्च महत्त्वाचा मानला जातो. इ.स. ६० च्या दरम्यान प्रभु येशू ख्रिस्ताचा शिष्य होऊन संत अंद्रिया यांनी लोकांना सेवा दिली. १९०२ मध्ये मिशन कार्याची पाहणी व विश्वास असणाऱ्यांची गरज पूर्ण करण्यासाठी संत अंद्रिया चर्चची कोनशिला लावण्यात आली. या चर्चला विद्युत रोषणाईने शुक्रवारपासून सजविण्यात आले आहे. या चर्चमध्ये सांताक्लॉजचे मोठे कटआऊट लावण्यात आले आहे. तसेच ख्रिस्त जन्माचा आकर्षक देखावा तयार करण्यात आला आहे. तेथे रविवारी सायंकाळ ६.३० वाजतापासून कार्यक्रमांना सुरूवात होणार आहे. पास्टर सुनील गोडबोले येशू ख्रिस्तांचा संदेश देणार असून त्यानंतर गितांचे गायन केले जाईल. कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या भक्तांकरिता भोजनाची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती चर्चचे सचिव प्रदीप देवगडे यांनी दिली. शहरामध्ये बल्लारपूर बायपास मार्गावर रय्यतवारी येथे लव्ह इंडिया फॅमिली चर्च स्थापन करण्यात आले आहे. या चर्चवरही विद्युत दिव्यांची रोषणाई करण्यात आली आहे. चर्चच्या आतामध्ये क्रॉसला चमकते दिवे लावण्यात आले आहेत. रविवारी सकाळी ८ वाजता पास्टर सुनील जॉर्ज कुमार, पास्टर अशोक साह, पास्टर रवीश घोटेकर आदी भक्तांना संदेश व सेवा देणार आहेत. त्यानंतर रविवारी सायंकाळी ख्रिस्त जन्माचा उत्सव साजरा केला जाणार आहे. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येणार असल्याची माहिती लव्ह इंडिया परिवाराचे सचिव सुनील नळे यांनी दिली. चंद्रपूर जिल्ह्यात सुमारे सुमारे ३५ हजार ख्रिस्ती समाजबांधव हे प्रॉटेस्टंट पंथाचे आहेत. नागपूर चर्च काऊंसिल हे त्यांचे धर्मपीठ आहे. त्याअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यात सुमारे ८० चर्च असून बहुतांश लोक हे प्रॉटेस्टंट पंथाचे असल्याची माहिती पास्टर सुनील जॉर्ज कुमार यांनी दिली. तुकूमधील सेंट थॉमस चर्चमध्ये शनिवारी रात्री ११.३० वाजता पार्थना होणार आहे. त्यानंतर केक कापून ख्रिस्त जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे. पास्टर बेन्नी भाविकांना संदेश देणार आहेत. बाबुपेठ येथील जीवन ज्योती चर्चेमध्ये रविवारी सकाळी ९ वाजता प्रार्थना होणार आहे. यावेळी पास्टर मथॉयस परागे संदेश देणार आहेत. भिवापूर भागात इंटरनल लाईट फेलोशीप चर्चमध्ये रविवारी सायंकाळी ६.३० वाजता प्रार्थना आयोजित करण्यात आली असून केक कापण्यात येणार असल्याचे पास्टर सुनील बकाली यांनी सांगितले. रोमन कॅथॉलिक पंथाच्यावतीने मूल मार्गावरील सभागृहात ख्रिसमस निमित्त केक कापण्यात येणार आहे. तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. (प्रतिनिधी)