शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

बोंड अळीच्या जागृतीसाठी निघाला चित्ररथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 22:44 IST

गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता मागील काही दिवसांपासून व्यक्त होत आहेत. तसेच काही ठिकाणी ही अळी आढळून येत असल्याबाबतच्या सूचनाही कृषी विभागाला मिळाल्या आहेत.

ठळक मुद्देउदय पाटील : गुलाबी बोंड अळीवर वेळीच फवारणी करा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता मागील काही दिवसांपासून व्यक्त होत आहेत. तसेच काही ठिकाणी ही अळी आढळून येत असल्याबाबतच्या सूचनाही कृषी विभागाला मिळाल्या आहेत. त्यामुळे सोमवारी बोंडअळी संदर्भातील जनजागरण करणाऱ्या चित्ररथाला हिरवी झेंडी दाखविण्यात आली. कापसाच्या पिकाला पाती लागायला सुरूवात झाल्यावर किंवा ४५ दिवसांनंतर गुलाबी बोंड अळीचे पतंगाचे पाहणी करुन फवारणी करावी, असे आवाहन जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील यांनी यावेळी केले.राज्य शासनाच्यामार्फत गुलाबी बोंड अळी पासून कपासीचे संरक्षण व्हावे, यासाठी अनेक मोहिम राबवली जात आहे. यासाठी सर्वत्र जनजागरण करण्यात येत आहे. मागील वर्षी कपाशीचे पीक घेऊ नये, अशा पद्धतीचे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले होते. तरीही अनेक शेतकऱ्यांनी या वर्षी आपल्या जमिनीमध्ये लाखो हेक्टरमध्ये कपाशीची पेरणी केलेली आहे. मात्र आता पेरणी केल्यानंतर ४० ते ४५ दिवसांच्या पिकांवर मोठ्या प्रमाणात लक्ष ठेवण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केलेले आहे. जर पाती लागायला सुरुवात झाली असेल आणि ४५ दिवसांनंतर गुलाबी बोंडअळीच्या पतंगाची अस्तित्व दिसून येत असेल तर फवारणी करणे आवश्यक आहे. यासाठी प्रति लिटर पाण्यामध्ये २ मिलीलीटर क्वीनॉलफॉस, थायोडीकार्ब, क्लोरोपायरी फॉस, सायपरमेथ्रीन आदी किटकनाशके योग्य प्रमाणात वापरावे, असे आवाहन त्यांनी केले.शेतकऱ्यांना जागृत करण्यात जिल्हाभरात चित्ररथाच्यामार्फत गुलाबी बोंड अळीची ओळख व जीवनक्रम याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. नागरिकांनी आपल्या गावामध्ये येणाऱ्या चित्ररथाचे स्वागत करावे, जनजागृतीसाठी वाटण्यात येणाºया पत्रकांतून गुलाबी बोंड अळीच्या व्यवस्थापनाबाबत निर्णय घ्यावा, अशा सूचनाही कृषी विभागाकडून करण्यात आल्या.फवारणी करताना काळजी घ्याशासनाने शिफारस केलेलीच कीटकनाशके परवानाधारक विक्रेत्यांकडूनच खरेदी करावी, तसेच त्याची काळजीपूर्वक फवारणी करवी, मागील वर्षी यवतमाळ, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी कीटकनाशकांमुळे विषबाधा झाल्याचे अनेक दुर्घटना घडल्या होत्या. या दुर्घटना टाळण्यासाठी फवारणी करताना संरक्षक पोषाख, बूट हातमोजे, नाकावरील मास्कचा वापर करावा, अशा सूचनाही दिल्या.