शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

चिमूरचा दैनंदिन बाजार बेमूदत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 23:29 IST

अंहिसा चौक ते नेहरू चौक परीसरात भरणारा दैनदिन भाजीपाला बाजार हुतात्मा स्मारक अभ्यंकर मैदान येथे हलविण्याकरिता नगर परीषदेने फर्माण काढले.

ठळक मुद्देभाजी मार्केट पडले ओस : नगर परिषदेच्या जाचाला कंटाळून निर्णय

आॅनलाईन लोकमतचिमूर : अंहिसा चौक ते नेहरू चौक परीसरात भरणारा दैनदिन भाजीपाला बाजार हुतात्मा स्मारक अभ्यंकर मैदान येथे हलविण्याकरिता नगर परीषदेने फर्माण काढले. आता भाजीपाला व्यावसायिकांना तेथे बळजबरीने नेले जात आहे. या जाचाला कंटाळून अखेर भाजीपाला विक्रेत्यांनी दैनदिन भाजीपाला गुजरी बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.चिमूर शहरातील दैनदिन गुजरी हुतात्मा स्मारक अंभ्यकर मैदान येथे अनेक वर्षांपासून भरत होती. मात्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी या परिसराचे सौंदर्यीकरण करण्यासाठी प्रस्ताव मंजूर केल्याने तत्कालीन ग्रामपंचायत प्रशासनाने ही गुजरी अहिंसा चौक ते नेहरू चौकात हलविली. तसेच यापूर्वी नेहमी यात्रा काळात नेहरू चौकापासून मुख्य रस्त्यावरच गुजरी भरायची. मात्र आता रहदारीला अडथळा होतो, या सबबीखाली नगर परिषदेने गुजरी अभ्यंकर मैदान येथे नेण्याचा घाट घातला आहे. व्यावसायिकांनीही अभ्यंकर मैदानात काही दिवस गुजरी भरविली. मात्र या ठिकाणी व्यवसाय होत नसल्याने पुन्हा भाजीपाला व्यावसायिक अहिंसा चौक ते नेहरू चौक येथेच परत आले. आता त्यांना पुन्हा अभ्यंकर मैदानात पाठविले जात आहे. २४ जानेवारीला भाजीपाला विक्रेत्यांना या संदर्भात नोटीस बजावली आहे. रोजच भाजीपाला विक्रेत्यांना नगरपालिकेच्या पथकाने उठविणे सुरू केले आहे. ३१ जानेवारीला तर या पथकाने व्यावसायिकांचा भाजीपाला जप्त करून कारवाई केली. रोजच्या या त्रासाला कंटाळून सर्व भाजीविक्रेत्यांनी शनिवारी तातडीची बैठक घेतली व रविवारपासून दैनंदिन भाजीपाला मार्केट बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.हा निर्णय त्यांनीच ध्वनीक्षेपकाद्वारे शहरात जाहीर केला. बाहेरगावावरून येणाºया भाजीपाला विक्रेत्यांनाही दुकान लावण्यास मज्जाव करण्यात आला आहे. या संदर्भातील एक निवेदन भाजीपाला व्यावसायिकांनी मुख्याधिकारी यांना दिले आहे.गृहिणींना चिंताशहरातील भाजीमार्केटच बंद असल्याने गृहिणी चिंताग्रस्त झाल्या आहेत. शहरात कुठेही भाजीपाला मिळत नसल्याने घरगृहस्थी कशी चालवायची, यात्रा काळात घरी आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार कसा करायचा, या विवंचनेत गृहिणी आणि नागरिकही दिसून येत आहेत.