शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

क्रांती जिल्ह्यासाठी चिमुरात मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 00:09 IST

स्वातंत्र्याच्या रणसंग्रामामध्ये विशेष भूमिका बजावणाºया चिमुरकरांनी मागील ४७ वर्षांपासून चिमुरला क्रांती जिल्हा घोषित करण्याची मागणी .....

ठळक मुद्देउपविभागीय अधिकाºयांना निवेदन : चिमूर क्रांती जिल्हा कृती समिती

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : स्वातंत्र्याच्या रणसंग्रामामध्ये विशेष भूमिका बजावणाºया चिमुरकरांनी मागील ४७ वर्षांपासून चिमुरला क्रांती जिल्हा घोषित करण्याची मागणी चिमूर क्रांती जिल्हा कृती समिती व नागरिकांकडून करण्यात येत आहे. शासनाने चिमूर क्रांती जिल्हा घोषित करावा, या मागणीसाठी कृती समितीचे अध्यक्ष नरेंद्र बडे व अनेक राजकीय पदाधिकाºयांच्या नेतृत्वात उपविभागीय कार्यालयावर चिमुरकरांचा शुक्रवारी दुपारी २ वाजता मोर्चा धडकला.स्वातंत्र लढ्यात मुख्य भूमिका बजावणारे चिमूर शहर १६ आॅगस्टपासून तीन दिवस प्रथम स्वतंत्र झाले होते. यासाठी अनेक स्वातंत्र संग्राम सैनिकांनी बलिदान दिले. तर अनेकांना काळ्या पाण्याच्या शिक्षा भोगाव्या लागल्या. ब्रिटीश सरकारच्या शासनात चिमूर जिल्हा (परगणा) अस्तीत्वात असल्याचे अनेक दाखले स्वातंत्र संग्राम सैनिकांकडून देण्यात येतात. त्यामुळे चिमूरला स्वातंत्र भारतातही स्वतंत्र जिल्हा घोषित करावा, ही मागणी चिमुरकराकडून सातत्याने करण्यात येत आहे.शासनाने चिमूर क्रांती जिल्ह्याची दखल घ्यावी, याकरिता कृती समितीच्या वतीने अनेक वर्षांपासून वेगवेगळी आंदोलने करून शासनाने लक्ष वेधण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून शुक्रवारला दुपारी २ वाजता बालाजी मंदिर परिसरातून कृती समितीचे अध्यक्ष नरेंद्र बंडे, माजी राज्यमंत्री डॉ. रमेशकुमार गजभे, जि.प. सदस्य गजानन बुटके, महासचिव सुनील मंैद, शिवसेना तालुकाप्रमुख धरमसिंह वर्मा, सुनील दाभेकर, माजी सरपंच मनीष नंदेश्वर यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला.मोर्चादरम्यान चिमूरक्रांती जिल्हा झालाच पाहिजे, असा कसा होत नाही झाल्याशिवाय राहत नाही, अशा घोषणा देत बहुसंख्य नागरिकांच्या उपस्थितीत मोर्चा उपविभागीय कार्यालयावर धडकला. मोर्चाचे निवेदन स्वीकारण्यासाठी उपविभागीय अधिकारी हरिष धार्मिक यांनी मोर्चेकºयांना समोरे जात कार्यालयापुढे स्वीकारले. मोर्चा सुरू होण्यापूर्वी बालाजी मंदिर परिसरात अनेक राजकीय, सामाजिक पुढाºयांनी जिल्ह्याच्या मागणीला अनुसरून मार्गदर्शन केले. यावेळी चिमुरातील नागरिक उपस्थित होते.स्वातंत्र संग्राम सैनिक काळे गुरुजींची जाणवली उणीवचिमूर क्रांती जिल्ह्याची मागणी प्रथमत: स्वातंत्र संग्राम सैनिक काळे गुरुजीपासून सुरू झाली. ९ आॅगस्ट क्रांती दिनापासून सुरू होणाºया प्रत्येक आंदोलनात काळे गुरुजी हिरहिरीने सहभाग घ्यायचे. मागील वर्षीच्या महामोर्चात वयाचे ९३ वर्षे गाठले तरी ते तरुणाला लाजवेल, अशा रुबाबात मोर्चात सहभागी झाले होते. मात्र मागील काही महिन्याअगोदर स्वातंत्र संग्राम सैनिक काळे गुरुजी जगाचा निरोप घेतल्याने या मोर्चात त्यांची उणीव प्रकर्षाने जाणवत होती.ग्राहकांना करावी लागली एक किमीची पायपीटचिमूर क्रांती जिल्हा झाला पाहिजे, यासाठी शुक्रवारला दुपारी मोर्चा काढण्यात आला. शुक्रवारला आठवडी बाजार असल्याने शांतता सुव्यवस्था राहावी, म्हणून पोलीस प्रशासनाने मोर्चा रस्त्याने जात असताना वाहतूक उपजिल्हा रुग्णालयाजवळ रोखल्याने ग्राहक व प्रवाशांना एक किमीची पायपीट करावी लागली.