शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

चिमुरात भरवस्तीत धाडसी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 21:56 IST

नेताजी वार्ड प्रभाग क्रमांक १० येथील इमरान इखलाख कुरेशी हे कुंटुबासोबत खरेदी करण्यासाठी दोन दिवसांपूर्वी बाहेरगावी गेले होते. दरम्यान, रविवारी सांयकाळी घरी आले असता रोख १ लाख ७० हजार व सोन्याच्या अंगठ्या व सोन्याची साखळी अंदाजे असा एकून अडीच लाखांचा एवज लंपास अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचे उघडकीस आले.

ठळक मुद्देअडीच लाखांचा मुद्देमाल लंपास : नागरिकांमध्ये दहशत

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : नेताजी वार्ड प्रभाग क्रमांक १० येथील इमरान इखलाख कुरेशी हे कुंटुबासोबत खरेदी करण्यासाठी दोन दिवसांपूर्वी बाहेरगावी गेले होते. दरम्यान, रविवारी सांयकाळी घरी आले असता रोख १ लाख ७० हजार व सोन्याच्या अंगठ्या व सोन्याची साखळी अंदाजे असा एकून अडीच लाखांचा एवज लंपास अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचे उघडकीस आले.चिमूर नगरपरिषद क्षेत्रातील नेताजी वार्ड येथील अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष इमरान कुरेशी यांच्या लहान भावाचे लग्न असल्याने लग्नाच्या खरेदीकरिता गुरूवारी नागपुरला कुंटुबासोबत गेले होते. त्यामुळे घरी कुणीही नसल्याची संधी साधुन अज्ञात चोरट्यांनी दरवाज्याचे कुलुप रॉडने तोडून घरात प्रवेश केला. स्वंपाक घरात असलेल्या कपाटातुन अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे सभासद रक्कम तसेच रोख १ लाख २० हजार व सोन्याची अंगठी व चैन असा एकूण अडीच लाखांचा मुद्देमाल चोरून नेला. इमरान कुरेशी यांच्या पत्नी आज सांयकाळी चार वाजताच्या सुमारास खरेदी करून घरी आल्या असता चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.घटनेची माहिती मिळताच उपपोलीस निरीक्षक गणेश इंगोले घटनास्थळी दाखल झाले. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनात करत आहेत. चिमूर पोलीस स्टेशन हद्दीत मागील दोन वर्र्षांपासून झालेल्या एकही चोरीच्या घटनेतील आरोपी गवसले नाहीत. त्यामुळे आरोपीला शोधण्याचे आव्हान पोलीस प्रशासनापुढे निर्माण झाले आहे.त्यामुळे चिमूर शहरात झालेली चोरी पोलीस प्रशासनापुढे आव्हान आहे. तालुक्यात मागील आठवड्यात काही गावांमध्ये चोऱ्या झाल्या होत्या. दोन-तीन महिन्यांपासून भुरट्या चोरांचा शहरात धुमाकूळ सुरु आहे. दरम्यान नेताजी वॉर्डात चोरी झाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भिती निर्माण झाली.