शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
3
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
4
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
5
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
6
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
7
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
8
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
9
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
10
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
11
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
12
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
13
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
14
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
15
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
16
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
17
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
18
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
19
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
20
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...

चिमूर तालुक्यात सर्वाधिक एक हजार ८९७ पाण्याचे स्त्रोत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 06:00 IST

ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत हातपंप व विहिरी असतात. त्यातील पाणी पिण्यायोग्य आहे की, नाही याबाबत चाचपणी करणे आवश्यक असते. त्यामुळे दरवर्षी गावातील हातपंप व विहिरीतील पाण्याची तपासणी केली जाते. पाण्यात दोष आढळल्यास त्यातील पाणी पिण्यायोग्य नसल्याचे नोंदविले जाते.

ठळक मुद्देबल्लारपूर तालुक्यात केवळ ४२५ स्त्रोत। ३१ मेपर्यंत होणार पाण्याची तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्कमूल : प्रत्येकाच्या आरोग्याच्या दृष्टीने पाणी हे महत्वाचा घटक आहे. त्यामुळे पाण्यात असलेले जैविक व रासायनिक घटक मानवाला घातक ठरू शकते. यासाठी चालु वर्षामध्ये जिल्ह्यातील सर्व स्त्रोतातील पिण्याच्या पाण्याची रासायनिक तपासणी केली जाणार आहे. सर्वाधिक चिमूर तालुक्यातील ९३ ग्रामपंचायतीमधील १ हजार ८९७ हातपंप व विहीरींचा समावेश आहे. तर सर्वाधिक कमी ४२५ स्त्रोत बल्लारपूर तालुक्यात आहेत.पाण्यात असलेल्या विविध विषाणुंमूळे थेट आरोग्यावार परिणाम होतो. त्यामुळे पाण्याची तपासणी करून योग्य की, अयोग्य याचा अहवाल जिल्हा परिषद प्रशासन सादर करणार आहे.ग्रामीण भागात पाण्याचे मुख्य स्त्रोत हातपंप व विहीरी असुन आरोग्याच्या दृष्टीने पिण्यायोग्य पाणी असणे गरजेचे आहे. यासाठी जिल्हा परिषदेने सन २०२०-२१ या वर्षात पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोताची रासायनिक तपासणी करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे.३१ मे २०२० पर्यंत चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील गावागावांतील पाण्याच्या नमुन्यांची तपासणी करण्यात येणार आहे.तालुका निहाय पाण्याचे स्त्रोतब्रम्हपूरी -१२९५ ,बल्लारपूर-४२५ ,भद्रावती -४६४ ,चंद्रपूर-८९१, चिमूर-१८९७, गोंडपिपरी-७२३, जिवती-४३९, कोरपना-७०४, मूल-११७१, नागभिड-१६१७, पोंभुर्णा-६८३, राजुरा-७७९, सावली-१४०८, सिंदेवाही-१२५८, वरोरा-१२१४,ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत हातपंप व विहिरी असतात. त्यातील पाणी पिण्यायोग्य आहे की, नाही याबाबत चाचपणी करणे आवश्यक असते. त्यामुळे दरवर्षी गावातील हातपंप व विहिरीतील पाण्याची तपासणी केली जाते. पाण्यात दोष आढळल्यास त्यातील पाणी पिण्यायोग्य नसल्याचे नोंदविले जाते. त्यामुळे त्या स्त्रोताचे पाणी पिण्यास थांबविण्याची सूचना दिली जाते.जिल्हा परिषदेच्या अधिपत्याखाली असलेल्या पाणी पुरवठा विभागाच्या पुढाकाराने पाण्याच्या स्त्रोताची तपासणी केली जात आहे. यात सर्वाधिक चिमूर तालुक्यात पाणी स्त्रोत आढळून आले आहे.- हर्षवर्धन गजभियेतालुका समन्वयकपं. स. मूल

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प