शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

चिमूर तालुक्यात २४७ बालके कुपोषणाच्या विळख्यात

By admin | Updated: August 14, 2015 01:15 IST

आजचे बालक उद्याचे देशाचे भविष्य आहे. त्यामुळे या बालकांची काळजी घेण्याचे काम शासनाकडून करण्यात येत आहे.

१४ बालके अतिकुपोषित : व्हीसीडीसीतून सुरू आहे उपचारखडसंगी : आजचे बालक उद्याचे देशाचे भविष्य आहे. त्यामुळे या बालकांची काळजी घेण्याचे काम शासनाकडून करण्यात येत आहे. कुपोषणापासून मुलांची सुटका करण्यासाठी व आरोग्य सदृष्ठ ठेवण्यासाठी अनेक योजना राबविण्यात येत असल्या तरी आजही चिमूर तालुक्यातील २४७ बालकांना कुपोषणाच्या विळख्यात अडकल्याचे विदारक चित्र पुढे आले आहे.राज्यात सध्या चर्चेत असलेल्या एकात्मिक बालविकास मंत्रालयाचा चिक्कीमुळे जनसामान्यांपर्यंत ही चिक्की पोहचली आहे. याच मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या एकात्मिक बालविकास प्रकल्पातून शुन्य ते सहा वयोगटातील मुलांची काळजी घेतली जाते. चिमूर तालुक्यात २७७ अंगणवाडी केंद्र व १० मिनी अंगणवाडी केंद्रातून ० ते ३ वयोगटातील सहा हजार ६८४ मुले तर तीन ते सहा वयोगटातील सहा हजार ७३७ विद्यार्थ्यांना पोषण आहार पुरविला जात आहे. मात्र मिळालेल्या माहितीनुसार चिमूर तालुक्यात आजघडीला २४७ बालक कुपोषणाच्या विळख्यात आहेत. त्यामध्ये सॅमचे १४ बालक तर मैमचे २३ बालक आहेत. अतिकुपोषीत बालकांना या प्रकारातून बाहेर काढण्यासाठी शासनस्तरावर अनेक उपक्रम राबवण्यात येत आहे. सॅमच्या बालकांसाठी व्ही.सी.डी.सी. केंद्रातून उपचार करण्यात येत. या केंद्रातून बालकांना बुधवार व शुक्रवारला अंडी आणि केळी देण्यात येत आहेत. सोबतच आई-वडीलांना समुपदेशनद्वारे मार्गदर्शन करण्यात येत आहे. तरी मात्र चिमूर तालुक्यात अतिकुपोषीत सॅमचे १४ बालक आहेत. त्यामुळे या बाल प्रकल्पामार्फत प्रयत्न करण्यात येत असले तरी मात्र ही संख्या कमी न झाल्याने प्रकल्पातून चालविलेल्या जाणाऱ्या उपाय योजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तर सॅम व मॅमची संख्या जरी कमी असली कुपोषणापासून मुक्ती मिळालेली नाही. त्यामुळे एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या उपाययोजनाही ‘फार्स’ तर नाही असा प्रश्न सर्वसाधारण नागरिकांकडून विचारला जात आहे. कुपोषणाची ही संख्या कमी करण्यासाठी प्रशासनाने प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी जिल्ह्यातील नागरिकांकडून होत आहे. (वार्ताहर)चिमूर तालुक्यात अतिकुपोषीत १४ बालक असून या बालकांना व्हीसीडीसी केंद्रातुन पोषण आहार व हप्त्यातून दोन दिवस केळी व अंडी देण्यात येत आहेत. तर या बालकाच्या पालकांचे सुद्धा समुपदेशन करून प्रमाण कुपोषण कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. २४७ बालके हे वजन आणि वयानुसार कुपोषीत आहेत. - एस.एस. मुल्ला, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी, चिमूर